भारतीय रेल्वे ही भारताच्या संपत्तीमधले प्रमुख साधन आहे. रेल्वेमुळे भारताचा विकास जलदगतीने झाला. रेल्वेमुळे अनेक लोक एकाचवेळी बऱ्याच लांबचा प्रवास पार करु शकतात. शिवाय त्याचे भाडे सुद्धा कमी असते. ट्रेनमध्ये एक मोठे शक्तिशाली असे इंजिन लावलेले असते.
ट्रेन तिच्या डब्ब्यांना एकत्र खुप वेगात खेटत असते. ट्रेनचा वापर हा केवळ प्रवाशांसाठी नाही तर मोठमोठ्या सामानाची ने आण करण्यासाठी सुद्धा करतात. ट्रेनमध्ये लोक आरामदायी प्रवास करतात. पुर्वीच्या काळी एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काही आठवडे लागायचे. पण ट्रेनमुळे ही तो प्रवास काही तासांचा झाला. रेल्वेमुळे अनेक शहरे आणि गावे एकमेकांशी जोडली गेली. भारताच्या विकासात रेल्वेचा महत्वपुर्ण वाटा आहे.
तुम्ही सुद्धा अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. पण तम्ही कधी रेल्वेच्या अॅव्हरेजबद्दल माहित आहे का. आपण वैयक्तिक गाडी चालवताना एव्हरेजची खुप काळजी घेतो. गाडी चालवताना आपली नजर प्रत्येकवेळी पेट्रोलच्या काट्यावर असते. पण तुम्हाला माहित आहे का एक किलोमीटर चालण्यासाठी रेल्वेला किती डिझेल लागत असेल. आपण या गोष्टींचा कधी विचार करत नाही. पण आज आम्ही तुम्हाला याचे उत्तर देणार आहोत.
रेल्वेला एक किलोमीटर चालण्यासाठी किती डिझेल लागत असेल याचा अंदाज लावणे खुप कठीण आहे. पण खुप रिसर्च केल्यानंतर याचे उत्तर हाती लागले आहे. एका व्यक्तीने सांगितले कि तो एकदा रात्री औरंगाबाद स्टेशनवर ट्रेनची वाट बघत होता. तेव्हा त्याने पाहिले कि ट्रेन चालक ट्रेनचे इंजिन उघडे ठेवुन कुठेतरी चहापाणी करायला गेला होता.
तेव्हा त्याच्या मनात प्रश्न आला कि हे लोक ट्रेनला असेच चालु ठेवुन निघुन जातात म्हणजे ट्रेन डिझेल खात नाही का ? त्यानंतर लगेच दुसरा प्रश्न आला की ट्रेन किती अॅव्हरेज देते.. तेव्हा तिथे रेल्वे चालक आला त्यावेळी त्यांना प्रश्न विचारला की, ते इंजिन चालु ठेवुनच का आले.. ट्रेनला डिझेल लागत नाही का?
तो रेल्वे चालकाचे नाव पवन कुमार होते. तो ग्वालियरचा राहणारा होता. त्याने सांगितले कि ट्रेनचे इंजिन बंद करणे सोपे असते मात्र ते चालु करणे खुप कठीण असते. ते पुन्हा चालु करण्यासाठी कमीत कमी २५ लीटर डिझेल खर्च होते. ट्रेन जर एक किलोमीटर चालत असेल तर ते एका किलोमीटरमध्ये १५ ते २० लिटर डिझेल खाते. रेल्वे चालकाकडुन मिळालेली ही माहिची खुप महत्वाची होती.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !