Headlines

पत्नीच्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी जाणून घ्या या सोप्या टिप्स !

सध्याचा धाव पळीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होत असतात. कामावरील तणाव ते घरातील छोट्या मोठ्या कुरकुरी मुळे नात्यामध्य अनेंकदा दुरावा निर्माण होत असतो. बहुतेक वेळा या गोष्टी नंतर मोठे स्वरूप प्राप्त करतात. पती पत्नीच्या नात्यात ‘राग’ हा बहुतेकदा आडवा येत असतो त्यामुळे खूप साऱ्या समस्या येत असतात. या समस्यांना नियंत्रित करण्याचे काही टिप्स चला जाणून घेऊयात.

लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढू लागतात. पती-पत्नीला स्वतःच्या सोबतच कुटुंबातील अन्य प्रत्येक सदस्याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि नवरा-बायकोमध्ये छोटे- मोठे भांडण हे किरकोळ असतात, परंतु कधीकधी या छोट्या छोट्या छोट्या गोष्टीच मोठे रूप धारण करतात आणि नात्यात तेढ निर्माण होते. अशी अनेक जोडपे देखील आहेत जिथे पत्नी नेहमी पतींवर रागावलेली असते. अशा पतींसमोर एक मोठे आव्हान असते ते म्हणजे आपल्या पत्नीला आनंदी कसे ठेवायचे.
शेवटी काय केले पाहिजे ते म्हणजे पत्नी आनंदी राहील, ती रागावू नये आणि घरात नेहमी आनंद खेळता राहील. आपण असा विचार करत असाल की हे शक्य आहे, कोणती पत्नी बिना रुसायची राहू शकते.हो अशी तुमची पत्नी बिना रुसायची राहू शकते तुम्ही जर काही गोष्टीची काळजी घ्याल तर. या काही गोष्टी प्रभावी आहेत, आजच प्रयत्न करून पहा.
रागामागील कारण जाणून घ्या – जेव्हा जेव्हातुमच्या पत्नीला राग येतो तेव्हा तिला शांत करण्याअगोदर सर्वप्रथम स्वतःला काही प्रश्न विचारा की त्यामागे आपला काही चुकी तर नाही. जर यामागचे कारण महत्वपूर्ण वाटत असेल तर बसून त्यांच्याशी सविस्तर बोला. यात तुमची चूक असल्यास, तुमच्या पत्नीची माफी मागा. जेव्हा राग शांत होईल तेव्हा त्यांना समजावून सांगा की प्रत्येक गोष्टीवर रागावणे काही योग्य नाही.
तक्रारी दूर करा – सर्वप्रथम तर तुम्ही तुमच्या पत्नीच्या ज्या काही तक्रारी असतील त्या दूर करा. जर ती म्हणाली की आपण त्यांना वेळ देत नाही आहात किंवा ती घरातील कामामुळे त्रस्त असेल. आपल्या घरात जर कामवाली बाई नसल्यास पत्नीला काही दिवस कामातुन मुक्त करा. त्यांच्यासाठी घर काम बाईची व्यवस्था करा. यानंतर, पत्नी घरातील कामांपासून मुक्त होईल आणि तुम्हाला वेळ एकत्र घालविता येऊ शकतो. पत्नीवर तुमचे हे शब्द प्रभावी ठरतील.  महिला घरात कामवाली बाई लावण्यास निश्चितच नकार देतात, परंतु तुम्ही सक्तीने त्यांना सांगा आणि म्हणा की काय तु दिवसभर कामच करत राहशील? बाईमुळे आपल्याला एकत्र वेळ घालविता येईल असे म्हणताच तुमची पत्नी लगेच राजी होईल.
पत्नी सोबत वेळ व्यतित करा – तुमच्या पत्नीची मनःस्थिती योग्य करण्यासाठी त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवा. त्यांच्याशी बोला, कदाचित त्यांच्या रागामागचे कारण म्हणजे तुमचे पत्नीला वेळ न देणे हे सुद्धा असू शकेल.
कौतुक करण्यास विसरू नका – पत्नीला जर रागावलेली पाहायची नसेल तर त्यांचे कौतुक करण्यास सुरवात करा. पत्नीशी संबंधित प्रत्येक गोष्टीचे कौतुक करा कारण कौतुक ऐकून त्यांना खूप छान वाटेल. वतल्यास ते कपडे असोत, जेवण असोत किंवा मुलांना तयार करण्याची पद्धत असो. गोष्टी अधिक प्रभावी करण्यासाठी त्यांच्या सौंदर्याबद्दल बोला, जर त्यांच्यात काही बदल झाला असेल तर त्यांना सांगा की आपण त्यांच्यावर लक्ष देत आहात. असे केल्याने, तुमची पत्नी नेहमीच चांगल्या मनःस्थितीत राहिल आणि ती तुमच्या वर कधीच रागावणार नाही.
पत्नीच्या माहेरच्या मंडळीबद्दल विचारपूस करा – जर आपण पत्नीला दुखी करायचे नसल्यास किंवा तिला रागावलेले पाहायचे नसेल तर पत्नीच्या माहेरच्या मंडळीबद्दल समाचार घेत रहा. उदाहरणार्थ, तिथे काय चालले आहे, आई वडील कसे आहेत आणि पत्नीचे भाऊ बहीण कसे आहेत?खूप दिवसापासून घरी आले नाहीत. अशा गोष्टी तुमच्या पत्नीसाठी असलेली काळजी दर्शविते.  म्हणून हे सर्व सांगत रहा आणि पत्नीच्या रागापासून दूर रहा. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की पत्नी सोबत कधीही तिसरा व्यक्ती समोर असेल तर अशा ठिकाणी कधीही आपल्या पत्नीशी भांडण करू नये. विशेषत: कोणत्याही पार्टी इत्यादी मध्ये तुम्ही त्यांना वाईट गोष्ट बोलू नका. या टिप्स केवळ प्रभावी नाहीत तर सुखी वैवाहिक आयुष्य जगण्याचा मंत्र देखील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *