Headlines

श्रीरामाने वनवासात खालेले कंदमुळ म्हणून खायला दिले जाणारे तुकडे म्हणजे काय बघा, वाचून तुम्हीही सुन्न व्हाल !

रामायण ही भारतीय संस्कृतीमधील एक प्रसिद्ध ऐतिहासिक कथा आहे. आपण लहानपणापासून नेहमीच रामायणामधील कथा ऐकत मोठे झालो आहोत. रामायणामध्ये दिलेली शिकवण, मर्यादापुरुषोत्तम राम, पतिव्रता सीता, भावासाठी स्वतःच आयुष्य त्यागणारा लक्ष्मण या सर्व गोष्टी आणि रामायणातही बारीक सारीक सर्वच गोष्टी लोकांच्या लक्षात आहेत.

सोनेरी हरीण, शबरीची बोर, रामाने खाल्लेलं कंदमूळ, सुग्रीव आणि बाली यांच्या युद्धाचा प्रसंग, रामसेतू, रावणाचा वध इत्यादी गोष्टी कथेसोबतच अगदी लक्षात आहेत. तर यापैकी एक म्हणजे रामाने वनवासादरम्यान खाल्लेलं कंदमूळ काही ठिकाणी विकलं जात आणि रामाने खाल्लेलं असल्याने सर्व जण श्रद्धेपोटी ते कंदमुळं खाताना दिसतात.


तर अशाच एका ठिकाणी रत्नागिरी अर्थात ज्योतिबा डोंगरावर काही विक्रेते रामाने खाल्लेले कंदमूळ म्हणून भलामोठा खांबासारखे कंदाचे काप विकत असतात. ते काप म्हणजे नेमकं काय हे कधी तुम्ही विचार केलाय का? जाणून घेऊया या कंदमुळाबद्दल …

या जोतिबाचा डोंगरावर विकलं जाणारं हे कंदमूळ अनेकजण फार श्रद्धेने खातात. रामाने वनवासात खाल्ले या विचाराने अनेकजण मोठ्या भक्तिभावाने हे खात असतात, पण कोणी विचार केलाय का एवढं मोठं मूळ नेमकं कोणत्या झाडाचा असेल? आणि हा प्रश्न एखाद्याला पडला आणि त्याने जर हा प्रश्न विक्रेत्याला विचारला तर विक्रेते सांगतात की ते जंगलातील वनस्पतीचे मूळ आहे.


पण हे नेमकं त्या वनस्पतीच मूळ आहे कि कंदमूळ या नावाखाली आपण काहीतरी तिसरेच खात नाही ना? हा विचार या श्रद्धेपोटी कोणी करताना दिसत नाही. पण हे नेमकं कोणत्या झाडाचं मूळ आहे, याच्या उत्सुकतेपोटी कोल्हापुरातील काही संशोधकांनी याचा शोध घेण्याचे ठरवले.

कोल्हापुरातील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. विनोद शिंपले, डॉ. निलेश पवार, डॉ. मानसिंग राजे निंबाळकर, यांना याबाबत शंका आली. काही विक्रेत्यांनी यावर उत्तर दिले होते कि, हे मूळ आफ्रिकेतून आयात करण्यात आले आहे. संशोधकांनी त्या विक्रेत्यांकडून त्या कन्नडचे काही काप घेतले आणि प्रयोगशाळेत ते तपासण्यासाठी नेले. त्यांनी प्रयोगशाळेमध्ये या वनस्पतीची संरचना तपासली.

कोल्हापूरात रामाने वनवासात खाल्लेले कंदमूळ म्हणून विकला जाणारा हा काप एकदल खोडाचा भाग असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पण कंदमूळ म्हणून विकले जाणारे वनस्पती बाहेरून आयात केलेली नसून कोल्हापुरात माळरानावर आढळणारी वनपस्ती जिच्यापासून दोरखंड बनवल्या जाणाऱ्या केकताड किंवा घायपात ह्या वनस्पती आहेत.

कंदमूळ म्हणून विकल्या जाणाऱ्या या वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्यानंतर तिला मधोमध एक बांबू सारखा कोंब येतो. त्याच्या टोकाला फुलोरा येऊन त्याला बीज लागतात. या फुलातून बीज रुजून त्या झाडावर त्याची छोटी छोटी पिल्लं तयार होतात हे या वनस्पतीची वैशिष्ट्ये आहे.

या अवस्थेत असताना वरचा बांबू आणि बाजूचे पाने काढून टाकले जातात. त्यास कंदमुळांसारखा आकार देऊन त्यावर लाल रंगाची काव लावून ते कंदमूळ जमिनीतून काढलेला आहे असे भासवून त्याची विक्री केली जाते. या संशोधकांनी अनोखी चाचणी करून या वनस्पतीच्या खोडाचा शोध घेताना डीएनए बारकोडींग पद्धतीचा वापर करण्यात आला.

काप म्हणून विकला जाणारा हा पदार्थ जेनेरिक नैसर्गिकरित्या गोड नसतो. त्यावर सॅकरीन टाकून ते गोड करण्यात येते. पण त्यामुळे ते काप अति प्रमाणात खाल्ल्यास अपायकारक ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !