Headlines

स्विफ्ट डिझायर, मारुती वॅगनआर यासारख्या जुन्या कार मारुती विकत आहे अर्ध्या किंमतीला, प्रारंभिक किंमत फक्त २ लाख, १० हजार रुपये, खरेदी कशी करावी हे जाणून घ्या !

स्वत:च घर असावं, घराच्या दारात स्वत:ची कार उभी असावी असे अनेकांचे स्वप्न असतं. फिरायला जाताना स्वत:ची गाडी असली की हवे तसे फिरता येते, मजा करता येते मात्र सध्याच्या काळात गाड्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे काहींना स्वत:च्या गाडीतून फिरण्याचे स्वप्न पुर्ण करता येत नाही. मात्र अशा लोकांसाठी आता एक खूश खबर आहे.

तुम्हाला स्वत:ची गाडी खरेदी करता येणार आहे. ते ही अर्ध्या किंमतीत. ही संधी मिळत आहे ट्रूव्हॅल्यू या साइटमुळे
देशातील सर्वात मोठी कार निर्माण करणारी कंपनी म्हणून मारूती सुजुकी कंपनी ओळखली जाते. ट्रूव्हॅल्यू या कंपनीमार्फत वापरलेल्या जुनी कार खरेदी करता येतात.

तुम्हाला सुद्धा तुमच्या बजेटमध्ये गाडी खरेदी करायची असेल तर तुम्ही येथून जून्या गाड्या कमी किंमतीत खरेदी करु शकता. ट्रूव्हॅल्यूच्या अधिकृत वेबसाईटवर मारूतीच्या वॅगेनार आणि डिझायर या गाड्यांची अर्ध्याहून कमी किंमतीत विक्री होत आहे. चला तर जाणून घेऊयात या गाड्यांबाबत !

मारुती स्विफ्ट डिजायर – जर तुम्ही सिडान कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार या कारची पेट्रोल व्हर्जनची एंट्री लेव्हल एलएक्सआय आहे. ही कार २०१६ चे मॉडेल आहे. आतापर्यंत या कारने १,५०,२३२ किलोमीटरचा प्रवास केला आहे. ही गाडी त्याच्या मालकाद्वारे विकली जात असून त्या गाडीची विक्री किंमत २.३० लाख रुपये नक्की केली आहे.

मारुती ओमनी – वैयक्तिक वापरापासून ते कमर्शियल वापरापर्यंत मारुती ओमनी ही गाडी उपयोगास येते. ही गाडी सुद्धा या साइटवर तुम्ही अगदी कमी किंमतीत खरेदी करु शकता. या वेबसाइटवर ही गाडी सुद्धा विक्रीस उपलब्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत या गाडीने ५४,६५१ किलोमीटर प्रवास केला आहे. या साइटवर ही गाडी २.१५ लाख रुपयांना विकली जात आहे.

मारुती वॅगनआर मारुती कंपनीची बेस्ट सेलिंग कार म्हणून ओळखली जाणारी मारुती वॅगनआर ही गाडीसुद्धा या साइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. दिलेल्या माहितीनुसार ही गाडी २०१२ चे मॉडेल आहे. या गाडीने आतापर्यंत ३९,८४३ किलोमीटरचा प्रवास केला आहे. ही गाडी तिच्या मालकाद्वारे विकली जात असून २.१० लाख रुपये ही गाडीची विक्री किंमत असेल.

वरील माहिती ट्रूव्हॅल्यू या वेबसाइटवर दिल्यानुसार आहे. ट्रूव्हॅल्यू हा मारुतीचा जुन्या गाड्या विक्रीचा चॅनेल आहे. वेबसाइट – https://www.marutisuzukitruevalue.com/ जूनी वाहने खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या नियम व अटी जाणून घ्या. सोबतच कागदपत्र आणि इतर दस्तावेज नीट तपासून पहा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !