सध्याच्या काळात मूलभूत गरजांची व्याख्या थोडी फार बदलली आहे असे म्हटले तरी हरकत नाही. कारण अन्न वस्त्र आणि निवारा सोबतच मोबाईल हा सुद्धा जीवनावश्यक गरज बनला आहे. मोबाईल हरवला किंवा तो चुकून लॉक झाला तर जीव नुसता वर खाली होतो. मोबाईल मध्ये वेगवेगळ्या कामाच्या गोष्टी, बँकेचे व्यवहार तसेच आठवण स्वरुपी फोटो अशा अनेक गोष्टी सेव्ह असतात.
मोबाईल मध्ये अनेक वैयक्तिक गोष्टी सुद्धा सेव्ह असतात. त्यामुळे आपण फोनला पीन किंवा पॅटर्न लॉक लावतो. पण काही वेळा आपण ते पीन किंवा पॅटर्न काय होते हेच विसरून जातो. पण आज आम्ही तुम्हाला एक अशी सोपी पद्धत सांगणार आहोत ज्या द्वारे तुम्ही सहज तुमचा फोन अनलॉक करू शकता.
त्यासाठी सर्वप्रथम दुसऱ्या कोणाच्या तरी फोन मधून https://myaccount.google.com/find-your-phone-guide ही युआरएल टाईप करा आणि मग ओके करा. त्यानंतर तुम्ही फोन मध्ये वापरत असलेल्या जीमेल ला लॉग इन करा. असे केल्यावर तुम्हाला फोनची लिस्ट मिळेल ज्यात तुमची आयडी लॉग इन आहे. त्यानंतर तुम्हाला त्या स्मार्ट फोनला निवडायचे आहे ज्याला तुम्हाला अनलॉक किंवा लॉक करायचा आहे.
असे केल्यावर तुम्हाला Lock Your Phone असे आलेले दिसेल. त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर नवीन पासवर्ड, पीन, किंवा पॅटर्न टाका. यामुळे तुम्ही आधी घातलेला पासवर्ड किंवा पॅटर्न बदलला जाईल. आणि तुम्ही सहज तुमचा फोन अनलॉक करू शकता.
दुसरी पद्धत –
तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी गुगल असिस्टंटचा सुद्धा वापर करता येतो. त्यासाठी तुमच्या फोन मध्ये गुगल असिस्टंट असणे गरजेचे आहे. आणि तो सेट असणे आवश्यक आहे.
तुमच्या व्हॉइस रेकॉर्डिंग साठी अनलॉक विथ व्हॉईस येथे क्लिक करा त्यानंतर तुम्हाला फक्त ओके गूगल एवढेच बोलायचे आहे ज्याद्वारे तुमचा स्मार्टफोन अनलॉक होईल. तसेच फोन हरवला असेल तर तुम्ही त्याला फॉरमॅट पण इथून करू शकता.
लेख आवडला असेल तर लाईक आणि शेयर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.