कोरोना चे संक्रमण थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत लॉक डाऊनलोड जाहीर केला होता. या व्हायरसपासून वाचवण्यासाठी लोकांना सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन सारखे केले जात आहे. त्यामुळे लोक सुद्धा सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे नवीन नवीन पर्याय शोधून काढत आहेत.
सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एका इ- रिक्षाचालकाने त्याची रिक्षा अशाप्रकारे डिझाईन केली आहे की त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग चे सर्व नियम पाळले जातील. या रिक्षाची डिझाईन बघून महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी या रिक्षाचालकाला स्वतः जॉब ऑफर केला आहे.
https://www.facebook.com/megamarathi/videos/517693738910743/
या डिझाईन केलेल्या रिक्षाचा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या परीक्षेला अशाप्रकारे डिझाईन केले आहे जेणेकरून यात बसलेले प्रवासी एकमेकांना स्पर्श करू शकणार नाहीत. या रिक्षेत रिक्षाचालका व्यतिरिक्त अजून चार प्रवासी आरामात बसू शकतात. प्रत्येक प्रवाशाला बसण्यासाठी वेगवेगळे भाग केले आहेत. या रिक्षांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळले गेले आहेत.
खुद्द आनंद महिंद्रा यांना या रिक्षाचालकाची आयडिया खूप आवडली त्यामुळे त्यांनी या व्यक्तीस जॉब ची ऑफर दिली आहे. महिंद्रा कंपनीचे कार्यकारी निर्देशक (ऑटो अॅण्ड फार्म सेक्टर) राजेश जेजुरीकर यांनी या ड्रायव्हरला रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम मध्ये ॲडव्हायझर म्हणून जॉब ऑफर केला आहे.
हे वाचा – बजरंगी भाईजान चित्रपटातील आईचे पात्र निभावणारी अभिनेत्री खरी कशी दिसते पहा !
या रिक्षाचालकाच्या या कल्पनेवर त्यांनी सांगितले की आपल्या देशातील लोकांची कल्पनाशक्ती आणि वेगवेगळ्या परिस्थितीत मिसळून जाण्याची क्षमता बघून मी खरंच हैराण होऊन जातो. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे याचा पत्ता अजून लागलेला नाही पण हा व्हिडिओ बघितल्यावर तो रिक्षाचालक पश्चिम बंगालचा आहे असे वाटते. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसतो.
हे वाचा – बॉलिवूडमध्ये येण्यासाठी या अक्टर्सनी सोडल्या या मोठया-मोठ्या नोकऱ्या, जाणून थक्क व्हाल !
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !