एकेकाळची सुंदर अभिनेत्री भाग्यश्री ने ‘मैने प्यार किया’ चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या मनात एक विशिष्ट जागा निर्माण केली होती. भाग्यश्री आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनःपदार्पण करणार असल्याची बातमी हाती येत आहे. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटांमधून सलमान खान सोबत स्क्रीन शेअर केल्यावर भाग्यश्री मोठ्या पडद्यावरून नाहीशी झाली. ती अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. नुकतेच तिने तिच्या गायब होण्यामागचे कारण सर्वांसमोर स्पष्ट केले आहे.
सलमान खान सोबत १९८९ मैने प्यार किया हा चित्रपट केल्यावर भाग्यश्री चे नशीब चमकले होते. मात्र ती अचानक गायब झाली. सर्वात शेवटी तिला २०१० मध्ये आलेल्या रेड अलर्ट द वॉर विदिन या चित्रपटात पाहिले गेले होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही.
भाग्यश्रीने सांगितले की तिच्या कुटुंबासाठी तिने अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला. पिंकविला ला दिलेल्या एका मुलाखतीत तिला विचारले गेले की अचानक बॉलीवूड मधून निघून जाण्याचा निर्णय तिच्यासाठी मुश्किल होता का ? तर यावर तिने हा पण आणि नाही पण ! असे उत्तर दिले. भाग्यश्री ने सांगितले की हा निर्णय घेणे तिच्यासाठी कठीण याकरिता होते कारण तिला पुरते कळून चुकले होते की काम करताना एक वेगळ्या प्रकारची मजा मिळते कामातून आनंद उपभोगता येतो. शिवाय ती हे काम अजूनही उत्तम प्रकारे करू शकते. आणि कठीण याकरिता नव्हते कारण तिचा मुलगा अभिमन्यू या जगात आल्यावर तिचे संपूर्ण लक्ष त्याच्या देखभालीवर आणि पालन पोषणावर केंद्रीत झाले. आणि हे सगळं करण्यात तिला एक वेगळाच आनंद मिळत होता.
भाग्यश्री चा मुलगा अभिमन्यू आता त्याच्या आईला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी प्रेरित करीत आहे. भाग्यश्री सांगते तिचा मुलगा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी तिला गेली दोन वर्षे मनवत आहे. अभिमन्यूने सांगितले की जेव्हा त्याने मर्द को दर्द नही होता हा चित्रपट केला तेव्हा त्याने त्याच्या आईला सांगितले की एकदा का तो चित्रपटात आला की तो त्याच्या आईला या दुनियेमधून पुन्हा एकदा फिल्मी दुनियेत नक्कीच आणणार.
अभिमन्युला नेहमी वाटते की त्याच्या आईने नेहमी मोकळेपणाने जीवन जगावे. अभिमन्यू बोलतो की दुनिया आता खूप बदलली आहे त्यामुळे त्याच्या आईला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बघणे अद्भुत ठरेल. भाग्यश्रीने तिच्या मुलाला प्रत्युत्तर देताना सांगितले जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा त्यांची इच्छा असते की त्यांच्या आईने सतत त्यांच्या आसपास रहावे मात्र आता अभिमन्यू स्वतः काम करतो त्यामुळे तो जाणतो की काम करताना किती सुख मिळते.
याच कारणामुळे तो मला मोठ्या पडद्यावर परतण्यास सांगत आहे. भाग्यश्री चा मुलगा अभिमन्यू दसानी ने मर्द को दर्द नही होता या चित्रपटांमधून त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. हा चित्रपट मार्च २०१९ ला प्रदर्शित झाला होता.
या कारणामुळे ‘मैने प्यार किया’ चित्रपटातील अभिनेत्री ‘भाग्यश्री’ चित्रपट सृष्टी पासून गेली दूर !
