Headlines

कोरोना पासून वाचण्यासाठी तयार केला तीन लाख रुपयांचा मास्क, जाणून घ्या काय आहे त्याची खासीयत !

फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. या व्हायरसची लागण झाल्यामुळे कित्येकांनी स्वतःचे प्राण गमावले तर अनेक जण मृत्यूच्या उंबरठ्याशी लढा देत आहेत. हा व्हायरस हवेमार्फत जास्त फैलावत असल्याकारणाने सध्या सर्वत्र मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. सध्या पुणे शहरात तीस हजाराहून अधिक कोरोना संक्रमित लोक आहेत तर १००० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे पुणे शहरात सुद्धा मास्क वापरण्याची सक्ती केली गेली आहे.
दरम्यान पुण्यात गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या शंकर कुराडे या व्यक्तीने कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी चक्क सोन्याचा मास्क तयार केला आहे. सोन्याचे शौकीन असलेले शंकर रोज त्यांच्या अंगावर तब्बल तीन किलो सोने घालून वावरत असतात. त्यांच्या गळ्यात मोठ्या सोन्याच्या चैनी, हातातील दहा बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या तसेच मनगटावर सोन्याचे ब्रेसलेट या प्रकारचे दागिने घालून ते त्यांचे सोन्यावर असलेले प्रेम दर्शवत असतात.
शंकर यांनी सोन्यापासून बनलेला हा मास्क २ लाख ९० हजार रुपयांना बनवून घेतला. हा मास्क साडेपाच तोळ्याचा आहे. या मास्क मध्ये श्वास घेण्यासाठी बारीक छिद्रे केली आहेत. शंकर यांच्यामध्ये त्यांचा हा सोन्याचा मास्क कोरोना पासून वाचण्यासाठी एकदम सुरक्षित आहे.

शंकर यांना लहानपणापासूनच सोन्याचे खूप वेड आहे. शंकर यांनी सांगितले की त्यांनी कोल्हापूर मध्ये एका व्यक्तीला चांदीचा मास्क घालून टीव्हीवर पाहिले होते त्यावेळी मला सोन्याचा मास्क बनवण्याची कल्पना आली. त्यानंतर लगेचच त्यांनी ही कल्पना त्यांच्या सोनाराला सांगितली व एका आठवड्यात त्यांच्या सोनाराने हा मास्क शंकर यांना बनवून दिला.
शंकर यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या परिवाराला सुद्धा सोने खूप आवडते त्यामुळे जर त्यांना सुद्धा असा मास्क हवा असल्यास मी नक्कीच त्यांना पण तो करून देईन. सोन्याचा हा मास्क घातल्यावर कोरोना माझ्या जवळ येईल की नाही हे ठाऊक नाही पण सोशल डिस्टंसिंग च्या सर्व नियमांचे पालन करून कोरोना पासून वाचण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !