अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणार जोडपं आहे. दोघे ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात आणि आपल्या चाहत्यांशी संपर्क साधतं असतात. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत.
आता अर्जुन कपूरने ‘कॉफी विथ करण’मध्ये मलायकासोबतच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल उघडपणे बोलला आहे. अर्जुन कपूर कॉफी विथ करण सीझन ७ च्या सहाव्या भागामध्ये पाहुणे म्हणून आले होते. शोमध्ये अर्जुन कपूर त्याची चुलत बहीण सोनम कपूरसोबत आला होता. शोचा होस्ट करण जोहर अर्जुन कपूरबद्दल त्याच्या वर्कफ्रंटपासून लग्न आणि अफेअरपर्यंत त्याच्यासोबत चर्चा केली.
अर्जुन गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत कधी लग्न करणार? – शोमध्ये करण जोहरने अर्जुन कपूरला त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराविषयी अनेक प्रश्न विचारले. करण जोहरने अर्जुन कपूरसोबतचे नाते पब्लिक करण्याच्या निर्णयाबद्दलही विचारले. करण जोहरने अर्जुनला विचारले की तो लग्न कधी करणार आहे? यावर उत्तर देताना अर्जुनने करणला सांगितले की, त्याचा लवकर लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. यामुळे मलायका आणि अर्जुन सध्या लग्न करू इच्छित नाहीत.
अर्जुन कपूर पुढे म्हणाला, “तो आणि मलायका सध्या लग्न करण्याचा विचार करत नाहीत. मी सध्या माझ्या करिअरवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो, कारण या लॉकडाऊनला आणि कोविडला आणि जे काही घडत होते त्याला दोन वर्षे झाली आहेत. मला माझ्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे.
” अर्जुन कपूर पुढे म्हणाला, “कारण मी खूप वास्तववादी व्यक्ती आहे, मला काहीही लपवण्याची गरज नाही. जर मी लाजाळू असतो किंवा मला काहीतरी लपवायचे असते तर मी इथे बसणारचं नाही. मला व्यावसायिकदृष्ट्या थोडे अधिक स्थिर व्हायचे आहे. मी भावनिकरित्या बोलतोय.”
माझ्या कामातून खूप आनंद मिळतो…’ – अर्जुन कपूर म्हणाला, “मला असे काम करायला आवडेल जे मला आनंद देईल. कारण जर मी आनंदी असेन तर मी माझ्या जोडीदाराला (मलायका अरोरा) आनंदी करू शकतो, मी आनंदी जीवन जगू शकतो. मला वाटते की मला आनंद माझ्या कामातून मिळतो.” तसेच एपिसोडमध्ये अर्जुनने मलायका त्याच्या आजीला भेटल्याचे सांगितले. त्याने आपल्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना त्यांच्या नात्याबद्दल कसे सांगितले याबद्दलही तो बोलला.
अर्जुन आणि मलायका बी-टॉनमधील सर्वात हॉट कपल – अर्जुन आणि मलायका यांनी काही वर्षांपूर्वी त्यांचे नाते पब्लिक केले होते. ते अनेकदा डेट्स, कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. त्यांच्या लग्नाच्या अ’फ’वा अनेकदा सोशल मीडियावर येत असतात. अर्जुन आणि मलायका हे बी-टॉनमधील सर्वात हॉट कपल आहे. मलायकाने काही वर्षांपूर्वी तिचा पहिला पती अरबाज खानपासून घ’ट’स्फो’ट घेतला होता. मलायका अरोराला एक मुलगा आहे, जो तिच्यासोबत राहतो.