बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू या दिवसांत तिचा थ्रिलर चित्रपट दोबारासाठी चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे. काही दिवसांपूर्वीच ती दोबाराच्या प्रमोशनसाठी दिल्लीला गेली होती. त्यावेळी तिने हिरव्या रंगाची रफल्ड साडी नेसली होती. तापसी त्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तापसीचा दोबारा हा चित्रपट 19 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होईल. हा चित्रपट अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला असून चित्रपटाचे जोरदार प्रमोशन चालू आहे.
दिल्लीतल्या प्रमोशन कार्यक्रमा दरम्यान तापसीने शिफॉन ग्रीन रफल्ड साड़ी नेसली होती. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. पण या साडीवर ब्लाउज न घालता तिने ब्रालेट घालून आपल्या लूकला हॉट तडका दिला होता.
भारतीय वेषात तापसी आपल्या घायळ करणाऱ्या अदांनी सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचत होती. सिल्वर हूप्स, न्यू’ड मेकअप आणि सेंटर पार्टेड हेयर बनने तिचा लूक पूर्ण केला होता. साडीतला तापसीचा अंदाज प्रत्येकाला भुरळ घालणारा होता. मध्यंतरी दोबाराच्या प्रमोशन निमित्त तापसी एका कार्यक्रमात गेली असताना तिचा तिथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्स सोबत भडका उडाला होता.
तिचा त्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेला. तापसी प्रमोशनच्या ठिकाणी पोहचली पण फोटोग्राफर्स साठी न थांबता थेट आतमध्ये गेली. त्यामुळे फोटोग्राफर्सनी वैतागून तिच्याबद्दल अपशब्द वापरले आणि नेमके तेच तापसीने ऐकले आणि तिने त्या फोटोग्राफर्सची कानउघडणी केली होती. पण त्यावेळी फोटोग्राफर्सनी सुद्धा तिला चोख उत्तर दिले होते.
तापसी पुढच्या वर्षी शाहरुख खानसोबत डंकी या चित्रपटात दिसणार आहे. राजू हिरानी या चित्रपटाला दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटानिमित्त तापसी पहिल्यांदाच किंग खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय ती बरथ नीलकंठन यांचा सायन्स फिक्शन ‘एलियन’,अजय बहल दिग्दर्शित ‘ब्लर’ , विजय सेतुपति सोबत ‘जण गण मन’ आणि ‘वो लड़की है कहां? या चित्रपटांत दिसणार आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !