पार्टी असो की अवॉर्ड नाईट, हिरोइन्समध्ये बोल्डनेसची स्पर्धा पाहायला मिळते. एकमेकांना मात देण्यासाठी या नायिका एकापेक्षा एक बोल्ड लूकमध्ये नटून थटून येतात. यासाठी अभिनेत्री तिच्या फॅशन स्टेटमेंटवर प्रयोग करते आणि धोका पत्करायला तयार होते. आता अभिनेत्री रोशनी वालियाने असाच एक प्रयोग केला आहे. रोशनी वालियाचा एस व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पार्टीतील रोशनीचा लूक – अभिनेत्री रोशनी वालियाच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्री लेट नाईट पार्टी लूकमध्ये अतिशय बोल्ड अंदाजात दिसत आहे. यादरम्यान रोशनी वालिया कॅमेऱ्यांसमोर तिच्या ड्रेसमुळे थोडी अस्वस्थ झालेली दिसते. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे रोशनीचा काळ्या रंगाचा एक ड्रेस स्ट्रॅपलेस आहे आणि समोरून डीप नेक आहे. रोशनी या ड्रेसेमध्ये खूपच अस्वस्थ दिसत आहे.
बोल्ड ड्रेसमध्ये अभिनेत्री अस्वस्थ – रोशनी वालियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिचा हा व्हिडिओ पाहून चाहते तिच्या सौंदर्याचे आणि धाडसी शैलीचे कौतुक करत आहेत. यासोबतच, सर्व नेटिझन्स रोशनीच्या या लूकला खूप बोल्ड म्हणत आहेत
आणि त्यांचे म्हणणे आहे की फॅशनला लिमिट आहे परंतु अभिनेत्रीने इतके बोल्ड कपडे घालू नये की तिला स्वतःला अस्वस्थ वाटेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्रीचा ड्रेस पुन्हा पुन्हा सरकत होता आणि ती प्रत्येक वेळी तो सावरण्याचा प्रयत्न करत होती.
View this post on Instagram
२० सप्टेंबर २००१ रोजी जन्मलेल्या रोशनी वालियाने अनेक टीव्ही शोमध्ये दमदार अभिनय करून चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. ‘मैं लक्ष्मी तेरे आंगन की’ या टीव्ही शोमध्ये तिने उत्तम काम केले. यानंतर रोशनी टीव्ही शो ‘रिंगा रिंगा रोजेस’मध्ये दिसली.
२०१४ मध्ये तिने प्रसिद्ध टीव्ही शो ‘भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप’ मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय रोशनीने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘माय फ्रेंड गणेशा-3’ आणि ‘मछली जल की रानी है’मध्ये ती दिसली होती.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !