गायक आणि संगीत दिग्दर्शक बी प्राकच्या घरात दुसऱ्यांना पाळणा हलणार होता मात्र त्याच्या बाळाने या जगात येताच क्षणी निरोप घेतला. त्यामुळे त्यांच्या घरात सध्या दुखद वातावरण आहे. बी प्राक आणि त्याची पत्नी मीरा हे दोघेही त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी खूप उत्सुक होते. पण बाळ जन्माला येताच क्षणी हे जर सोडून गेले. ही वाईट बातमी गायकाने सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांना दिली आहे. तसेच त्यांच्या या दुखद समयी त्यांच्या प्रायव्हर्सीचा आदर करावा अशी विनंती देखील त्याने केली आहे.
बी प्राक त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिले, मला सांगायला खूप दुख होत आहे की आमच्या जन्माला आलेल्या बाळाने या जगात येताक्षणी लगेचच जगाचा निरोप घेतला. एक पालक म्हणून सध्या आम्ही खूप वाईट परिस्थितीतून जात आहोत. आमच्या बाळाला वाचवण्यासाठी ज्या डॉक्टर्स आणि नर्सने शर्तीचे प्रयत्न केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. सध्या आम्ही सगळेच आतून खूप तुटलो आहोत. त्यामुऴे आमच्या प्रायवर्सीचा आदर करावात अशी तुम्हाला विनंती. तुमचाच मीरा आणि बी प्राक
बी प्राकच्या पहिल्या बाळाचा जन्म 2020 मध्ये झाला होता. तर त्याचे लग्न 2019 मध्ये चंदीगढ येथे झाले होते. काही दिवसांपूर्वीच त्याचे इश्क नहूी करते हे गाणे प्रदर्शित झाले. ते बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीच्या वाढदिवसाला लॉन्च करण्यात आले.
बी प्राकच्या पत्नीबद्दल बोलायचे झाल्यास तिचे नाव मीरा बच्चन असे आहे. बच्चन हे नाव वाचून तुम्हाला वाटेल ती अमिताभ बच्चन यांची नातलग आहे पण तसे नाही. ती लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. ती व्यवसायाने एक फिटनेस ट्रेनर आहे. ती तिचे वैयक्तिक व्लॉग सोशल मीडियावर सतत शेअर करत असते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !