Headlines

अखेर कॅटरिनाला ध’म’की देणारा पोलिसांच्या ताब्यात, या धक्कादायक कारणामुळे तो देत होता ध’म’की, जाणून घ्या !

अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती विकी कौशल नुकतेच मालदीववरुन परतले आहेत. कतरिनाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी ते दोघे त्यांच्या मित्रपरिवारासह तिथे गेले होते. पण तिथून परतल्यावर कतरिना आणि विकीला सोशल मीडियावरुन जी’वे मा’र’ण्या’च्या ध’म’क्या येऊ लागल्या होत्या.

एका अज्ञात व्यक्तीकडून या ध’म’क्या येत असल्याचे म्हटले जाते. कतरिना आणि विकीला ध’म’की देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुंबई पोलिसांनी तक्रार नोंदवली असून याप्रकरणी पोलिसांनीही तातडीने तपास सुरू केला.

विकी कौशलने या संदर्भात सांताक्रूझ पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवली होती. अहवालात दिलेल्या माहितीनुसार एक अज्ञात व्यक्ती सोशल मीडियाद्वारे कतरिनावर नजर ठेवून होती. विकी कौशलने त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न ही केला. मात्र त्याने काही ऐकले नाही. शेवटी विकीने त्याची पोलिसांत तक्रार नोंदवली.

विकी कौशलने पोलिसांत आपल्या पत्नीला एक अज्ञात व्यक्ती सतत ध’म’की’चे संदेश पाठवत असून तिचा पाठलाग करत असल्याची तक्रार केलेली. आता पोलिसांनी त्या व्यक्तीला पकडले आहे. कतरिना आणि विक्की कौशल यांना ध’म’की देणाऱ्या व्यक्तीचे नाव मनविंदर सिंग असून तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

मनविंदर हा कतरिना कैफचा मोठा चाहता आहे आणि त्याला कतरिनाशी लग्न करण्याची इच्छा होती. मात्र कतरिनाने विकी कौशलसोबत लग्न केले. हाच राग मनात ठेवून गेल्या काही महिन्यांपासून मनविंदर कतरिनाला सोशल मीडियावर सतत त्रास देत होता.

विकी कौशलच्या तक्रारी नुसार सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध आयपीसीच्या कलम ५०६-२ (गु’न्हे’गा’री ध’म’की) आणि ३५४-डी (पाठलाग) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

सेलिब्रेटींना ध’म’क्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. 29 मे रोजी पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा ह’त्या करण्यात आली होती. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोपर्यंत सलमान खान व त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्कर, करण जौहर, मनु पंजाबीलाही ध’म’की देण्यात आली होती.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांना बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हटले जाते. त्यांना 9 डिसेंबर 2021 मध्ये जोधपूर येथे विवाहगाठ बांधली. त्यांनी त्यांचे नाते खूप लपवले होते. लग्नाच्या काही दिवस आधीच ते सर्वांसमोर उघड झाले. त्यांनी लग्नही अगदी खासगी पद्धतीत केले. सध्या ते एकमेकांसोबत सुखाचा संसार करत आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !