जान्हवी कपूर हल्ली भरपूर चर्चेत आहे. जान्हवीच्या पोस्ट तिचे फोटोशूट या सगळ्यामुळेच जान्हवीचे नाव सध्या सगळ्यांच्याच तोंडावर आहे. जान्हवीने तिच्या हॉट अदांनी सगळ्यांचेचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे. ज्यामुळे जान्हवीचे फॅन फॉलोइंग देखील दिवसेंदिवस वाढत जात आहे. जान्हवीचे फॅन्स तिच्यासाठी खूप क्रेझी आहेत.
जान्हवीने हल्लीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन पोस्ट केली आहे जे बघून प्रत्येक जण तिचे कौतुक करत आहेत. इंस्टाग्रामवर जान्हवीचे १९ दशलक्ष फॉलोअर आहेत. जान्हवीने केलेल्या नवीन पोस्टमध्ये तिने चॉकलेटी रंगाचा ड्रेस घातला आहे ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे.
कमेंट बॉक्समध्ये जान्हवीचे फॅन्स तिच्या या लूकवर भरपूर कमेंट करत आहेत. २०१८ मध्ये आलेल्या ‘धडक’ या चित्रपटातून जान्हवीने तिच्या अभिनयातील करिअरला सुरुवात केली. धडक चित्रपट सैराट या मराठीमधील चित्रपटचा रिमेक आहे.
सोशल मीडियावर जान्हवीला कधी ट्रोल केले जाते तर कधी तिचे खूप कौतुक केले जाते. जान्हवी हल्ली सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह झाली आहे. तिच्या फॅन्ससाठी ती सतत वेगवेगळे फोटो इंस्टग्रामवर शेअर करत असते.
या फोटोना जान्हवीचे फॅन्स चांगलाच प्रतिसाद देतात. आणि तिचे फोटो वायरल देखील होतात. जान्हवीने चित्रपटात काम केल्यानंतर तर तिची फॅन फॉलोइंग वाढलीच पण हल्ली तिच्या वेगवेगळ्या फोटोशूट मूळे देखील तिची फॅन फॉलोइंग मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
View this post on Instagram
जान्हवीने अवघ्या २५ वर्षांमध्ये चांगलेच नाव कामावले आहे. जान्हवीने तिचे शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मधून पूर्ण केले आहे. धडक या चित्रपटात काम करण्यापूर्वी जान्हवीने ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूट मधून अभिनयाचे धडे घेतले ही इन्स्टिट्यूट कालिफोर्नियामध्ये आहे. श्रीदेवीची मुलगी असल्यामुळे जान्हवीला लहानपणापासूनच अभिनयाचे धडे मिळत होते.
धडक चित्रपटात काम केल्यानंतर २०२० मध्ये आलेल्या नेटफ्लिक्सच्या गोस्ट स्टोरीज या हॉरर सिरीजमध्ये जान्हवीने काम केले. त्यानंतर गुंजन सक्सेना यांच्यावर बनवलेल्या बायोपिकमध्ये देखील जान्हवीने काम केले ज्याचे नाव गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल असे होते. या बायोपीकमधील जान्हवीने केलेल्या अभिन्यासाठी तिचे खूपच कौतुक केले गेले. या चित्रपटसाठी जान्हवीला फिल्मफेअरमध्ये नॉमिनेशन देखील मिळाले होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !