अभिनेत्री जान्हवी कपूरला पाहिजे असा बॉयफ्रेंड, पण शोधून तरी सापडेल का तिला असा बॉयफ्रेंड, जाणून घ्या !

416

बॉलिवूड कलाकार कोणत्याना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या चाहत्यांना कलाकारांच्या प्रोफेशन लाइफपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय चालू आहे जाणून घेण्यात खूप रस असतो. चाहत्यांच्या आयुष्यात कोणत्या छोट्या मोठ्या गोष्टी चालू आहेत हे जाणून घ्यायचे असते. काही दिवसांपूर्वीच जान्हवीने आपल्या गुड लक जेरी या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिच्या वैयक्तिक खास करुन तिच्या लव्ह लाईफवर खुलासा केला. तर आज आम्ही तुम्हाला त्याबद्दलच सांगणार आहोत.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरबद्दल अनेकदा ती कोणा बिझनेसमन किंवा कोणत्या एका कलाकारासोबत रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा होत असतात. पण जान्हवीच्या मते या सर्व अफवा आहेत. यासंदर्भात खुलासा करताना जान्हवी म्हणाली की, ती हॅप्पिली सिंगल आहे.

कॉफी विथ करण च्या ७ व्या सीजनमध्ये जान्हवी अभिनेत्री सारा अली खान सोबत पाहुणी म्हणून गेली होती तेव्हा तिने याबाबत सांगितले. जान्हवीने सांगितले की ती सिंगल असूनही खूप खुश आहे. हा कधी कधी तिला एकटेपणा जाणवतो. जर कोणी तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीपासून दूर राहणे पसंत करते.

शो मध्ये जान्हवी कपूरला तुला बॉयफ्रेंड कसा हवा हा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना जान्हवीने सांगितले की तो माझ्यासोबत चांगला राहणारा असावा, त्याने मला हसवले पाहिजे, जर तो तसा असेल तर मी सुद्धा त्याच्यासाठी कायम चांगली राहिन.

या आधी जान्हवीचे शाहिद कपूरचा लहान भाऊ इशान खट्टरसोबत नाव जोडले गेले होते. ते दोघे धडक या चित्रपटात एकत्र दिसलेले. त्याचदरम्यान दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !