Headlines

अमिताभ बच्चन यांनी सांगितले जया बच्चन यांच्या सोबत का लग्न केले याचे धक्कादायक कारण !

बॉलिवू़डमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना आदर्श जोडपे मानले जाते. दोघांनीही इतकी वर्षे सुखाचा संसार करुन काम आणि नाती यांच्यात समतोल कसा राखावा हे जगाला दाखवून दिले. बिग बी सध्या कौन बनेगा करोडपतीमध्ये दिसत आहेत.

तिथे ते उपस्थित स्पर्धकांशी खूप मजामस्ती करतात. तसेच तिथे ते अनेक गोष्टींचा खुलासादेखील करतात. अशाच येणाऱ्या एपिसोडमध्ये बिग बींनी आपण जया बच्चनसोबत लग्न का केले याचा खुलासा केला आहे.

कौन बनेगा करोडपतीचा नवा प्रोमा समोर आला आहे. येणाऱ्या एपिसोडमध्ये प्रियंका महर्षि या स्पर्धक हॉट सीटवर आहेत. आणि बिग बी त्यांच्याशी गप्पा मारत आहेत.

त्यावेळी स्पर्धकाच्या केसांचे कौतुक करताना बिग बी म्हणाले, मी माझ्या पत्नीशी लग्न करण्यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे त्यांचे केस खूप लांब होते. याव्यतिरिक्त बिग बी स्पर्धकाच्या दोन्ही हातांवर असलेल्या टॅटूबद्दलसुद्धा चौकशी करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)


कौन बनेगा करडोपतीच्या सेटवर अमिताभ बच्चन अनेकदा हॉट सीटवर बसून आपले आणि जया बच्चन यांचे किस्से शेअर करत असतात. ते आपल्या पत्नीसाठी करवाचौथचे व्रतदेखील करतात हे देखील त्यांनी सांगितले होते.

जंजीर या चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या महिन्यातच अमिताभ बच्चन यांचा 80 वा वाढदिवस साजरा झाला. तेव्हा जया बच्चन आणि अभिषेक बच्चन हे बिग बींना भेटायला सेटवर गेले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !