Headlines

अल्लू अर्जुनच्या पत्नीचे साडीवरचे हॉट फोटोज व्हायरल, साडीची किंमत पाहून थक्क व्हाल !

अल्लू अर्जुन साऊथ इंडस्ट्रीमधील एक नावाजलेलं नाव आहे. हिंदी इंडस्ट्रीमध्ये देखील अल्लू अर्जुनची क्रेझ तेवढीच आहे. अल्लू अर्जुनने त्याच्या अभिनयाच्या जोरावर कित्येक चित्रपट गाजवले आहेत. पुष्पा चित्रपटानंतर तर लहानातली लहान मुलं देखील झुकेगा नही सालाची ऍकटिंग करत होते. अल्लू अर्जुनची बायको देखील तेवढीच सुंदर, हॉट आणि फिट आहे. अल्लू स्नेहा रेड्डी सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असते. अल्लू अर्जुन प्रमाणेच स्नेहाचे देखील भरपूर फॅन्स आहेत.

अल्लू अर्जुन चित्रपट सृष्टीत जेवढा ऍक्टिव्ह आहे तेवढीच ऍक्टिव्ह आणि अपडेट त्याची बायको सोशल मीडियावर आहे. स्नेहाचे प्रत्येक फोटो खास असतात आणि तिचे तेवढेच कौतुक देखील केले जाते. यावेळी स्नेहा इंस्टाग्रामवर सोनपरी बनून आली होती यावेळेस तर सगळे फॅन्स तिच्यावर एकदम फिदा झाले.

सगळेच तिच्या सौंदर्याच कौतुक करत आहेत. अल्लू अर्जुन प्रमाणेच त्याच्या बायकोने देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज स्नेहाचे इंस्टाग्रामवर ८.६ मिलीयन फॉलोअर आहेत तर अल्लू अर्जुनचे १९.७ दशलक्ष फॉलोअर आहेत.

अल्लू स्नेहा रेड्डीचा साडी लूक – काही दिवसांपूर्वी स्नेहाने तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर मस्टर्ड रंगाच्या साडीतले फोटो पोस्ट केले आहेत. ज्यावर सोनेरी रंगाच्या धाग्याने बारीक डिझाईन केले आहे. मध्ये मध्ये साडीवर डिझाईन देखील केलेले आहे. ही साडी स्नेहावर खूपच सुंदर दिसत आहे. यावर तिने स्लीव्हलेस ब्लाउज घातला आहे. सोबत गळ्यात चोकर त्यावर मॅचिंग कानातले हातात अंगठी आणि बांगड्या देखील घातल्या आहेत. केस मोकळे सोडले आहेत. या सगळ्यामुळे तिच्या सौंदर्याला आणखी चार चाँद लागले आहेत.

स्नेहाच्या ग्लॅमरस लुकवर सगळेच झाले फिदा – क्षितिज जालोरी यांनी ही साडी डिझाईन केली आहे. संपूर्ण साडी सिल्क सॅटिन ऑरगेंजा फॅब्रिकने तयार केली गेली आहे. स्लीव्हलेस ब्लाउजमूळे स्नेहा आणखीच हॉट दिसत आहे ज्याला लो कट नेकलाईन आहे.

ज्यासोबत लाईट मेकअप देखील केला आहे आणि मोकळ्या केसांमुळे तर ती आणखीनच स्टनींग दिसत आहे. स्नेहाच्या या फोटोला लाखो लोकांनी लाईक केले आहे. तिने फोटो पोस्ट केल्यापासून लाईक्सची संख्या वाढताच जात आहे. कमेंट बॉक्समध्ये देखील भरपूर कमेंट्स येत आहेत. यावरून स्नेहाची फॅन फॉलोईंग किती आहे याचा आपल्याला अंदाज येतो.

डिझायनर साडीची किमत – अल्लू स्नेहा रेड्डीने घातलेली ही साडी क्षितिज जालोरी यांच्या नवीन ब्रायडल कलेक्शनचा भाग आहे. या साडीची किंमत त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईडवर ५९,८०० रुपये एवढी आहे. नक्कीच ही किंमत मोठी आहे. पण या साडीमुळे स्नेहाला जो लूक आला आहे त्यामुळे हे सगळे पैसे वसुल झाले आहेत.

स्नेहाच्या फॅन्सकडून साडीचे आणि तिचे देखील कौतुक केले जात आहे. या आधी देखील स्नेहाने साडी लुकमधील अनेक फोटो पोस्ट केले आहेत. यातील प्रत्येक फोटोमध्ये ती तितकीच सुंदर दिसत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !