Headlines

उर्फी जावेदला साडी घालून झोका खेळणं पडलं महागात, अचानक झोक्यावरून पडली आणि साडी गेली … !

उर्फी जावेद सध्या सोशल मीडियावरील सतत चर्चिला जाणार विषय बनली आहे. लोकांचे लक्ष सतत आपल्यावर खिळून राहावे यासाठी ती सतत काहीना काहीतरी करत असते. आपल्या विचित्र फॅशनद्वारे ती चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. तिच्याबाबतीत पुन्हा एकदा तसंच घडलं आहे. पण यावेळी तिच्या फॅशनमुळे नाही तर ती आपल्या डान्स व्हिडिओमुळे चर्चेत आहे.

उर्फीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.त्यात ती झोपाळ्यावर उभी राहून मादक डान्स करत असते. तिच्या आजुबाजुला काही मुलं डान्स करत असतात. पण अचानक तिचा पाय सरकुन तोल जातो आणि ती खाली पडते. तेव्हा तिच्या आजुबाजुला असलेल्या मुलांनी तिला सावरले.

हा व्हिडिओ तिच्या हाय हाय मजबुरी या म्युझिक व्हिडिओमधील एका सीनचा आहे. बीटीएस व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ये तो सच का हाय हाय हो गया था… उर्फीने ही घटना सुद्धा हलक्यात घेतली.

उर्फीने हा व्हिडिओ शेअर करताच तो तुफान व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये ती शूटिंग दरम्यान डान्स करत असतानाच धडपडते आणि खाली पडते तितक्यात तिला आजुबाजुची मुलं सावरतात. या व्हिडिओला आतापर्यंत 46 हजार पेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)


युजर्स या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. उर्फीचे चाहते नशीब तुला दुखापत झाली नाही तू सुरक्षित आहेस अशी कमेंट करत आहेत.तर अनेकजण उर्फीची खिल्ली उडवत कमेंटमध्ये तू आधीच एवढी खाली पडलेली आहेस. आणखी किती पडशील असे म्हणत आहेत.

एकाने म्हणून एवढी ओव्हर अॅक्टिंग करु नये असे लिहिले, तर आणखी एकाने झोपळ्याला सुद्धा तुला सांभाळता आलं नाही अशी कमेंट केली आहे. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओमुळे तिची मजा घेत आहेत.

उर्फीच्या म्युझिक व्हिडिओबद्दल बोलायचे झाल्यास तो मागच्या आठवड्यातच रिलिज झाला. या गाण्याला आतापर्यंत 6 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. उर्फी आपल्या अतरंगी फॅशनमुळे आणि बेताल बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र असे असूनदेखील तिच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. इन्स्टाग्रामवर तिचे 3.7 मिलियन फॉलोवर्स आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !