बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रीच्या यादीत जान्हवी कपूरचे नाव हळूहळू अग्र स्थानी येऊ लागले आहे. जान्हवी ही बोनी कपूर आणि सुपरस्टार श्रीदेवीची मोठी लेक. जान्हवी देखील आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत यशाची शिखरे चढत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा गुड लक जेरी प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे तिचे खूप कौतुक झाले. जान्हवी अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहते. त्यावेळी कॅमेऱ्याच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असतात.
बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा मीडियाच्या नजरेत येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालत असतात. पण काही वेळेस ते कपडे सांभाळताना त्यांच्या नाकी नऊ येते आणि त्या उप्स मुमेंटची शिकार होतात.
तसे पाहायला गेल्यास जान्हवीने खूप कमी वेळात मोठे यश मिळावले आहे. सध्या मोठमोठे ब्रॅण्ड जान्हवीने त्यांच्यासाठी काम करावे यासाठी उत्सुक असतात. जान्हवी एका जाहिरातीसाठी दोन ते तीन कोटी रुपये घेते. जान्हवी कपूर एका ब्रॅण्डच्या जाहिरातीच्या कार्यक्रमाला गेलेली.
तेव्हा तिने खूप सुंदर कपडे परिधान केलेले त्यामुळे सगळ्य़ांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. तिने घातलेल्या कपड्यांवरुन ती तिच्या फिटनेसकडे किती बारकाईने लक्ष देते हे दिसून येत होते. पण काहींनी मात्र तिला तिच्या कपड्यामुळे ट्रोल केले. अशा कार्यक्रमांना असे अंगप्रदर्शन करणारे कपडे घालतात का असे अनेकजण म्हणू लागले.
पण जान्हवीने मात्र अशा ट्रोलर्सकडे फारसे लक्ष दिले नाही. स्वताला स्पर्धेत टिकवायचे असेल तर स्वताकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे ठाम मत जान्हवीचे आहे. त्यामुळे ती बिनधास्त उपस्थित पापाराझींना पोज देते.
जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास २९ जुलैला तिचा गुड लक जेरी प्रदर्शित झाला. हा चित्रपट साऊथ चित्रपटाचा रिमेक होता. साऊथच्या चित्रपटात अभिनेत्री नयनताराने प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच ती बवाल या चित्रपटातसुद्धा दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वरुण धवन दिसेल. जान्हवीच्या जन गण मन या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. या चित्रपटात तिच्यासोबत साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि पूजा हेगडे दिसणार आहे. यासोबतच जान्हवी करण जोहरच्या दोस्ताना २ मध्येही दिसेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !