Headlines

चंकी पांडेला फराह खानने चांगलंच झापलं, म्हणाली तू तुझ्या पोरीला सांभाळ आधी … बघा नक्की काय झालं !

सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ रोज व्हायरल होतच असतात. त्यात जर ते व्हिडीओ बॉलिवुडकरांशी संबंधित असतील तर त्यांना काहीवेळेस जास्तच फुटेज मिळते. नुकताच अनन्या पांडे आणि फराह खानचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला. त्यांच्या या मस्तीवाल्या व्हिडीओला अनेकांनी कमेंट केली. पण त्यातल्या एका कमेंटने जास्त लक्ष वेधुन घेतले. ती कमेंट होती अनन्याचे वडिल चंकी पांडे यांची. यावेळी चंकी यांनी त्यांच्या लेकीवर कमेंट न करता सरळ पंगा घेतला तो फराह खान सोबत.

फाराह खान ही बॉलिवुडमधल्या बिंधास्त बेधडक बोलणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. काही दिवसांपुर्वी अनन्याने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शे्र केला होता ज्यात ती हिरव्या रंगाच्या आऊटफिटमध्ये ड्रेसिंग रुममध्ये बसुन स्वताची ओळख करुन देत होती. तिचा हा व्हिडीओ शुट होत असतानाच मध्ये फराहची एंट्री झाली.

यात फराह अनन्याला म्हणते की खाली पिली साठी नॅशलन अवॉर्ड दिला आहे. तिचे बोलणे ऐकुन अनन्याच्या चेहऱ्यावर मोठे हसु येते. त्याचवेळी फराह बोलते की ती तर मजा करत होती. या व्हिडीओला चंकी पांडे ने कमेंट केली आहे व त्यात फराहच्या अॅक्टींगला ओव्हर अॅक्टींग म्हटले आहे. यावर फराहने सुद्धा जशास तशी रिकमेंट करत तु आधी तुझ्या मुलीला सांभाळ असे म्हटले आहे.

अनन्याने या व्हिडीओला 50 रुपए काट ओवरएक्टिंग के असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओच्या कमेंट सेक्शन मध्ये फराहसोबतच अनन्याच्या लुकच्यासुद्धा चर्चा होत आहे. दोघांचा हा मस्तीभरा अंदाज लोकांना खुप आवडला आहे.