Headlines

दृश्यम फेम श्रिया सरणने लोकांमध्ये केली अशी गोष्ट लोक म्हणाले काय घर नाही का घरात करायला .. !

‘दृश्यम २’ मधील अभिनेत्री श्रिया सरन जी साऊथ इंडस्ट्रीमधील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. १८ नोव्हेंबर रोजी दृश्यम चित्रपट रिलीज झाला त्यामुळे श्रिया सध्या चर्चेमध्ये आहे. या चित्रपटाला प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. ज्यामुळे सगळीकडेच या चित्रपटाबाबत चर्चा सुरु आहे. यांचदरम्यान श्रियाला तिच्या नवरा आंद्रेई कोस्चिव सोबत एअरपोर्टवर पाहिले गेले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. हा व्होडिओ पाहून अनेक जण तिला ट्रोल करत आहेत.

श्रियाचा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर वायरल – सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यानी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये श्रिया तिच्या नवऱ्यासोबत एअरपोर्टवर दिसत आहेत आणि या दोघांनी कॅमेरासमोर एकमेकांना लिप किस केलं.

एकीकडे लोकांना हे चांगले वाटले तर काही लोक या कृतिबद्दल श्रियाला बरंच काही बोलले. ही काही पहिली वेळ नाही जेव्हा त्या दोघांनी सगळ्यांसमोर किस केलं, याआधी देखील या दोघांनी सगळ्यांसमोर किस केलं आहे आणि ते व्हिडीओ देखील सोशल मीडियावर वायरल झाले होते.

श्रियाच्या व्हिडीओवरील लोकांच्या कमेंट्स – श्रिया सरनचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी तिला भरपूर ट्रोल केले. एकाने कमेंट केली आहे, ‘तुला काय घरात जागा कमी पडली म्हणून इथे कॅमेरा समोर शो ऑफ करत आहेस’. एकाने लिहिले आहे,’सगळ्यांना माहित आहे तुम्ही नवरा बायको आहात हे करण्याची गरज होती का?’. एकाने लिहिले आहे,’हे दोघ ठरकी आहेत कुठेही सुरु होतात’. तर एक जण लिहितो,’यांचं डोकंच खराब आहे.’

१९ मार्च २०१८ रोजी श्रिया सरन आणि आंद्रेई कोस्चिव – यांनी लग्न केले. उदयपूर राजस्थानमध्ये त्यांनी लग्न केले आता त्यांना लहान बाळ देखील आहे. तेलगू, हिंदी, मल्याळम, तमिळ, कन्नड भाषेत आणि हॉलिवूडमध्ये देखील श्रियाने काम केले आहे. श्रियाचा नवरा टेनिस प्लेअर आणि उद्योजक आहे. श्रिया आणि तिचा नवरा दोघेही अगदी सुखाने एकमेकांसोबत राहत आहेत. अनेकदा श्रिया आणि तिच्या नवऱ्याला एकत्र फिरताना पाहिले जाते.

बॉलिवूड इंडस्ट्रिमध्ये श्रियाने आज चांगले नाव कामावले आहे. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने अनेक पारितोषिक मिळवले आहेत. श्रियाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाजी, दृश्यम, दृश्यम २, आरआरआर, बाहुबली २, जिस्म २ या सारख्या अनेक चित्रपटांमध्ये श्रियाने काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


श्रिया कोणतेही काम करत असताना ते अगदी मनापासून करते त्यामुळे तीचे कौतुक देखील केले जाते. श्रिया आधी डांसर होती त्यानंतर २००१ सालापासून तिने चित्रपट सृष्टीत काम करायला सुरुवात केली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !