Headlines

दृश्यम मधल्या विजय साळगावकरची मुलगी अनु झालेय आता खूपच मोठी आणि ग्लॅमरस, पहा फोटोस !

अजय देवगनचा दृश्यम हा चित्रपट सगळ्यांनाच माहित आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगन सोबतच तब्बू, श्रिया सारन, इशिता दत्त, मृणाल जाधव यांनी काम केले आहे. हल्लीच दृश्यम २ चा टीझर रिलीज झाला आहे. यात पहिल्या भागाची झलक देखील आपल्याला पाहायला मिळते.

यादरम्यान ज्या पोस्ट केल्या जात आहेत त्या प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. दृश्यममध्ये दाखवलेली अजय देवगनची छोटी मुलगी अनु, हिला पाहून लोक अचंबित राहिले आहेत. तब्बल सात वर्षानंतर ती आता आपल्याला दृश्यम २ मध्ये दिसणार आहे. छोटी असणारी अनु मोठी झाली आहे. तिचे फोटो पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

चार वर्षांची असल्यापासून करतेय काम – दृश्यम २ चा टीझर रिलीज झाल्यानंतर अनुला पाहून सगळेच थक्क झाले आहेत. आता मृणाल जाधव १३ वर्षाची झाली आहे. २०१२ मध्ये आलेली मालिका ‘राधा की बावरी’ पासून तिने चाईल्ड आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली.

या मालिकेत काम करत असताना ती फक्त ४ वर्षांची होती. रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या चित्रपटात देखील तिने काम केले आहे. यानंतर तिने मॉडलिंग करायला सुरुवात केली.


सोशल मीडियावर अनु म्हणजेच मृणाल जाधव हिचे ग्लॅमरस फोटो पाहायला मिळत आहेत. अनुने दृश्यममध्ये केलेल्या कामामुळे संगळ्यांचीच मनं जिंकली होती. आता चित्रपटाचा फक्त टीझर रिलीज झाल्यापासून अनुचे फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत.

२०२० मध्ये तिने केलेल्या ट्रान्सफॉर्मेशन चे फोटो टाकून आधीच तिने सगळ्यांना शॉक केले होते. या फोटोमध्ये ती खूपच फिट आणि ग्लॅमरस दिसत होती. मृणालचे वडील पोलीस ऑफिसर आहेत आणि आई संगीता जाधव गृहिणी आहे. मृणालच्या वडिलांनीच तिला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी प्रेरित केले.


दृश्यम या चित्रपटातून मृणाल जाधवने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि प्रेक्षकांच्या मनात जागा देखील केली. यासोबतच मृणाल मॉडलिंग क्षेत्रात देखील काम करत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !