Headlines

नवऱ्याला सोडून ही नायिका ‘भावा’सोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागली, अभिनेता म्हणाला राखी बांधली आणि आता त्याच्यासोबतच…

अभिनेता करण मेहरा आणि अभिनेत्री निशा रावल यांच्या वैवाहिक आयुष्यात सध्या खूप मोठे वादळ घोंगावत आहेत. गेली दोन वर्षे ते एकमेकांवर गंभीर आरोप लावत आहेत. सर्वात आधी निशाने करण तिच्यावर शारीरिक तसेच मानसिक अ’त्या’चा’र करत असल्याचे संपूर्ण मीडिया समोर सांगितले होते. त्यानंतर आता करणने प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या पत्नीवर अनेक आरोप लावले आहेत. तसेच ती आपल्या भावासोबतच लिव इन मध्ये राहत असल्याचा आरोप करणने निशावर केला आहे.

ये रिश्ता क्या कहेलाता है या मालिकेतील नैतिक या पात्रामुळे करण प्रसिद्धीच्या झोतात आलेला. त्याचे वैवाहिक आयुष्य देखील खूप छान चालू होते. मात्र अचानक काहीतरी बिनसले आणि त्यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरु झाला. आता करणने आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधांबद्दल खळबळजनक खुलासे केले आहेत.

करणने सांगितले की, निशा त्याला त्यांच्या मुलाला भेटू देत नाही. ती त्याच्याच घरात एका परपुरुषासोबत राहत आहे. मुंबईतील एका प्रेस कॉन्फरन्सवेळी करणने निशा संबंधीत काही खळबळजनक खुलासे केले. करणने म्हटले की, निशा तिचा मानलेला भाऊ रोहित साथियासोबत लिव इन मध्ये राहत आहे. ते दोघे माझ्याच घरात राहत आहेत. एवढेच नव्हे तर रोहितने त्याच्या व निशाच्या लग्नात तिचा भाऊ म्हणून निशाचे कन्यादानही केले होते.

पण गेल्या वर्षीच मला या सर्व गोष्टी समजल्या. मला स्वताला विश्वास होत नव्हता. पण या गोष्टी त्यावेळी मी जगाला सांगितल्या असत्या तर माझ्यावर कोणीच विश्वास ठेवला नसता. मला पुरावे सापडायला १४ महिने लागले. मी खूप जणांचा सल्ला घेतला. अनेक गोष्टी मिळवल्या. माझ्या मित्रांनी सुद्धा मला काही गोष्टी सांगितल्या. विशेष म्हणजे या सर्व गोष्टी माझ्या मुलाच्या समोरच घडत होत्या.

कंगणा रणौतच्या लॉक अप या रिअॅलिटील शो मध्ये निशाने तिचे लग्नानंतर सुद्धा अफेअर असल्याची कबुली दिली होती. यावर करण म्हणाला की, हेच मी केले असते तर लोकांनी मला नाव ठेवली असती. पण मी आता शांत बसणार नाही. निशा रोहन सोबत राहत असल्याचे पुरावे मी देणार. ते केवळ भाऊ बहिण असल्याचे जगाला सांगायचे. तसेच करणने त्याला एका अज्ञात नंबरवरुन जिवे मारण्याची धमकी आल्याचे सुद्धा सांगितले. याआधी निशाने करण तिला मारहाण करत असल्याचा आरोप लावला होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !