Headlines

प्रियांका चोप्राच्या या वाईट सवयीमुळे तिचा नवरा झालाय परेशान, ती कपडे काढून … !

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आता एर ग्लोबल आयकॉन झाली आहे. किंबहूना ती बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडमध्येच जास्त दिसते असे म्हटल्यास हरकत नाही. ती अभिनेत्री होण्यासोबतच एक उत्कृष्ट माणूस देखील आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक जीवनातील विनोदी किस्से आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

निक जोनास सोबत लग्न झाल्यापासून ती परदेशात स्थायिक झाली आहे.प्रियंकाने नुकतेच तिच्या चाहत्यांसोबत असे काही शेअर केले ज्यामुळे चाहत्यांना हसू देखील आले आणि आश्चर्य सुद्धा वाटले. लग्नानंतर बायकांच्या काही सवयी या अशा असतात की ज्या त्या मोठ्या ग्लोबल स्टार जरी झाल्या तरी त्या बदलत नाहीत. असंच काहीस प्रियंकाचे देखील आहे. ती तिच्या पतीचे सामान चोरते. हो हे खरे आहे. मिलियन डॉलरमध्ये कमावणारी ही अभिनेत्री अनेकदा निकचे जॅकेट किंवा टी शर्ट चोरते.

‘How It Started and How It’s Going’ चॅलेंजमध्ये याबाबत अभिनेत्रीने खुलासा केला. ती म्हणाली की तिला आपल्या पतीचे कपडे चोरून घालायला खूप आवडतात. एवढेच नाही तर ती निकचे शूजसुद्धा चोरुन घालायचा प्रयत्न करत असते पण तिला ते सूट होत नाहीत.

प्रियंकाने पुढे सांगितले की, ती निकच्या वॉर्डरोबमधून जवळपास सर्वच गोष्टी चोरते. मी माझ्या नवऱ्याचे कपडे घालते. मला त्याचे शूज फिट होत नाहीत. नाहीतर मी त्याचे सगळे शूजसुद्धा घेतले असते. मी त्याचे जॅकेट घालते, त्याचे सनग्लासेस सुद्धा घालते.

प्रियंका लवकरच आपल्याला रुसो ब्रदर्सच्या प्रोडक्शनचा चित्रपट सिलाडेल मध्ये दिसणार आहे. शिवाय हॉलीवुड फिल्म ‘एंडिंग थिंग्स’आणि ‘इट्स ऑल कमिंग बैक टू मी’मध्ये सुद्धा दिसणार आहे. तिच्या बॉलिवूड चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच अभिनेत्री कतरीना कैफ आणि आलिया भट्टसोबत जी ले जरा या चित्रपटात दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !