Headlines

फक्त सुशांत सिंग राजपूत सोबत नाही तर या अभिनेत्यासोबत पण रिया चक्रवर्तीचे होते संबंध !

रिया चक्रवर्ती हे नाव सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर आपण अनेकदा ऐकलं. रिया चक्रवर्ती हि सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड होती. रिया चक्रवर्तीने १ जुलै रोजी तिचा ३० वा वाढदिवस साजरा केला. या अभिनेत्रीने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत ‘जलेबी’, ‘चेहरे’ आणि ‘सोनाली केबल’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

ही अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल कारकिर्दीसोबतच वैयक्तिक कारणामुळेही खूप चर्चेत असते. सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी रिया चक्रवर्तीचे नाव अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत जोडले गेले होते. चला तर पाहूया कोण आहेत हे कलाकार …..

१. हर्षवर्धन कपूर – २०१७ मध्ये, रिया चक्रवर्ती हर्षवर्धन कपूरसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत येऊ लागली. ते फक्त रियाच्या वाढदिवसाच्या पार्टीतच दिसले नाहीत तर दोघेही अनेक प्रसंगी एकत्र हँग आउट करताना दिसले. हर्षवर्धनची सारा अली खानसोबतची जवळीक वाढल्यानंतर रिया आणि तो वेगळे झाले.

२. महेश भट्ट – महेश भट्ट कदाचित तिचे मेंटॉर होते परंतु अनेकदा त्या दोघांनाच्या नात्याला कपल म्हणून नाव देण्यात आले. महेश भट्ट आणि रिया चक्रवर्तीचा तो फोटो फारच व्हायरल झाला होता. महेश भट्टसोबत रियाचा एक फोटो होता, ज्यामध्ये महेश भट्ट रियाच्या खांद्यावर डोकं ठेवताना दिसत होते. रिया आणि महेश या दोघांनीही हि सगळी चर्चा आणि नाते नाकारले. रियाने त्याला तिच्या आयुष्यातील ‘फादर फिगर’ असेही संबोधले.

३. सुशांत सिग राजपूत – सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांनी कधीही त्यांचे नाते सार्वजनिक केले नव्हते. सुशांत सिंगच्या मृत्यूपूर्वीही संपूर्ण जगाला या नात्याबद्दल फारशी माहिती नव्हती. सुशांतच्या मृत्यूनंतर रियाने तिचे नाते सार्वजनिक केले. सुशांतच्या कुटुंबीयांनी आता रिया चक्रवर्तीवर आ’त्म’ह’त्ये’स प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. रिया चक्रवर्ती सध्या जामिनावर आहे.

४. आदित्य रॉय कपूर – सुशांत सिंग राजपूतच्या घटनेनंतर आदित्य रॉय कपूर आणि रिया चक्रवर्तीचे फोटो ऑनलाइन समोर आले, त्यांच्या डेटिंगबद्दल चर्चा देखील सुरु होती. सुशांत सिंग राजपूतसोबत घडलेल्या प्रकारानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला चाहत्यांनी खूप ट्रोल केले. या दोघांचा सध्या ब्रेकअप झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !