Headlines

फक्त ८ चित्रपट केले पण रियाची आहे करोडो रुपयांची प्रॉपर्टी, जाणून घ्या नक्की कशातून मिळवलेत तिने पैसे !

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला 2 वर्ष पूर्ण झाली तरी त्या मागचे कोडे अजूनही सुटलेले नाही. आता पुन्हा एकदा या प्रकरणाने डोके वर काढले आहे. ना’र्को’टि’क्स कं’ट्रो’ल ब्यु’रो’ने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्र’ग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.

यामध्ये रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांच्यासोबत 35 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिया चक्रवर्तीवर सुशांत सिंग राजपूतसाठी ड्र’ग्ज खरेदी करण्याचा आणि त्याला व्य’स’ना’धीन होण्यासाठी प्रवृत्त केल्याचाही आरोप आहे. हे सर्व आरोप सिद्ध झाल्यास रिया चक्रवर्तीला 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

खरेतर रिया चक्रवर्ती हे नाव सुशांत सिंहमुळे वर आले. नाहीतर लोकांना ती फारशी माहित सुद्धा नव्हती. रियाने तिच्या करियरमध्ये 8 चित्रपट केले आहेत. तिचा जन्म 1 जुलै 1992 ला बंगळुरूमध्ये झाला. तिने 2012 मध्ये ‘तुनीगा तुनीगा’ या तेलुगु चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर 2013 मध्ये तिने मेमेरे डॅड की मारुती’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

2012 ते 2021 या 9 वर्षांच्या कालावधीत रिया चक्रवर्तीने 8 चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तरीही तिची मुंबईत करोडोंची मालमत्ता आहे. मुंबईसारख्या महागड्या शहरात तिचे दोन फ्लॅट आहेत.

सध्या रियाच्या नावावर खार मधील एक 85 लाख रुपयांचा फ्लॅट आहे. पण त्यावर 60 लाख रुपयांचे गृहकर्ज आहे. ही मालमत्ता 550 स्क्वेअर फूटांची आहे. तर दुसरी प्रॉपर्टी तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्या नावावर आहे. ती त्यांनी 2012 मध्ये विकत घेतली होती. त्याची किंमत 60 लाख रुपये असून रायगड जिल्ह्यातील उलवे येथे आहे ती 1130 चौरस फूट आहेत.

रिया दरमहा 2.5 लाख रुपये कमावते. त्यावरुन ती एका वर्षात 30 लाखांहून अधिक कमाई करते. तिची एकूण संपत्ती 1.5 मिलियन डॉलर्स म्हणजे 11 करोडच्या आसपास आहे. ती एका चित्रपटासाठी 30 लाख रुपये घेते.
रियाने 2009 मध्ये एमटीव्हीच्या टीन दिना या रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता. ती त्या शोची फर्स्ट रनरप ठरली.

त्यानंतर तिची एमटीव्हीसाठीच्या व्हिडिओ जॉकी म्हणून निवड झाली. त्यासाठी तिने दिल्लीला ऑडिशन दिली होती.
त्यावेळी रियाने व्हिडिओ जॉकी म्हणून ‘MTV Wassup’, ‘Tiktack’ आणि ‘College Beat’ यासांरख्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले होते. हे सर्व चालू असतानाच तिला अभिनय क्षेत्र खूणावत होते. रिया खरेतर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होती. पण अभिनयात करीअर करण्यासाठी तिने तिचे शिक्षण अर्धवट सोडले.

2014 मध्ये तिने सोनाली केबल नावाचा चित्रपट केला पण तो दणक्यात आदळला. पुढे 3 वर्षे तिला कोणतेच काम मिळाले नाही. पुढे 2017 मध्ये ‘हाफ गर्लफ्रेंड’ आणि ‘दोबारा: सी योर ईविल’ या चित्रपटात तिला छोट्या भूमिका मिळाल्या. त्यानंतर बॅंक चोर आणि जलेबी हे चित्रपट तिने केले जे सूपर फ्लॉप ठरले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !