Headlines

बिग बॉस फेम जास्मिन भसीन आलेय तिच्या बोल्ड फोटोशूट मुळे चर्चेत, पहा फोटोज !

बिग बॉसमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री जस्मिन भसीन हिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले. सोबतच तिने काही तमिळ इंडस्ट्रीतही काम केले आहे. जस्मिन हिने बिग बॉस आणि खतरों के खिलाडी यासारख्या टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच जस्मिनचा गिप्पी ग्रेवालसोबतचा हनिमून हा चित्रपट प्रदर्शित झाला.

सध्या सर्वत्र हॅलोविन फेस्टिवलचे वातावरण आहे. खरतर ही एक पाश्चात्य संकल्पना असली तरी भारतात सुद्धा मोठ्याप्रमाणावर हा फेस्टिवल साजरा केला जातो. सध्या बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतले अनेक कलाकार या हॅलोविन पार्ट्यांचे आयोजन करत आहेत तर काही जण त्या पार्ट्यांना उपस्थिती लावत आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अंकिता लोखंडेकडे झालेल्या हॅलोविन पार्टीसा जस्मिनने आपला प्रियकर अली गोनीसोबत उपस्थिती लावली होती. या संदर्भातील फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये चाहते तिच्या लूकचे खूप कौतुक करत आहेत.

2017 मध्ये कलर्स टीव्हीवरील दिल से दिल तक या मालिकेत जस्मिन हिने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाईसोबत काम केले होते. ही मालिका 2018 मध्ये संपली. त्यानंतर तिने स्टंटवर आधारित शो खतरों के खिलाडीमध्ये भाग घेतला.

2019 मध्ये जस्मिन हिने स्टार प्लसवरील हॅप्पी है जी या मालिकेत हॅप्पी मेहरा भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने हा शो सोडला तिच्या जागी डोनल बिष्टीने काम केले. डिसेंबर 2019मध्ये एकता कपूरच्या नागीन 4 मध्ये जस्मिन हिने अभिनय केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jasmin Bhasin (@jasminbhasin2806)


यात तिने नयनतारा ही भूमिका साकारली पण तीपण तिने अर्धवट सोडली. पुढे रश्मी देसाईने तिच्या बदली ती भूमिका साकरली. 2020 मध्ये ती पुन्हा एकदा खतरों के खिलाडी मध्ये भाग घेतला तेव्हा ती तिने ३ रा क्रमांक पटकावला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !