Headlines

बॉलिवूडमधील एकही चित्रपट न करता शेहनाज गिल कमावते करोडो रुपये, बघा कुठून पैसे मिळवते ती !

शेहनाझ गिल हे नाव आपण सगळ्यांनीच कित्येकदा ऐकले आहे. मनोरंजन विश्वातील शेहनाझ सध्यायचे गजलेले नाव आहे. सलमान खानने शेहनाझला ‘पंजाब की कटरिना’ असे नाव दिले होते. बिग बॉस १३ मध्ये शेहनाझ आली होती, ती हा शो तर जिंकली नाही पण आपल्या स्वभावने तिने सगळ्यांची मनं जिंकली.

बिग बॉसमूळे फेमस झाली शेहनाझ – बिगबॉसमध्ये येण्याआधी शेहनाझ पंजाबमध्ये मॉडलिंग आणि सिंगिंग करायची. पंजाबमधील काही म्युझिक अल्बममध्ये सुद्धा ती दिसली होती. बिग बॉसमध्ये आल्यावर शेहनाझ गिलला खरी ओळख मिळाली. बिग बॉस मधल्या सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाझच्या जोडीला सगळ्यांनीच चांगली पसंती दिली. शेहनाझचा लाघवी स्वभाव आणि कॉमेडीमूळे तिने सगळ्यांची मनं जिंकली त्यामुळेच आता शेहनाझचे भरपूर फॅन्स आहेत.


बिग बॉसमधून बाहेर आल्यावर सुद्धा शेहनाझ लोकांचे मनोरंजन करत राहिली. वेगवेगळ्या रियालिटी शोमध्ये देखील तिला बोलावले गेले. याचदरम्यान शेहनाझचा म्युझिक अल्बम देखील आला होता. बिग बॉसमधून बाहेर आल्यावर ‘होसला रख’ नावाचा पंजाबी चित्रपट देखील मिळाला. शेहनाझ हे नाव इंडस्ट्रितील टॉपच्या नामवंत अभिनेत्रींमध्ये घेतले जाते.

शेहनाझच्या करिअरची सुरुवात – बिग बॉसमध्ये येण्याआधी शेहनाझ पंजाबी इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. २०१५ मध्ये आलेल्या गुरविंदर बरार यांच्या ‘शिव दी किताब’ या गाण्यापासून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘माझे दी जट्टी ’ या गाण्यानंतर तिला जास्त लोकप्रियता मिळाली. यानंतर तिचे अनेक म्युझिक अल्बम देखील आले सोबतच ती अनेक मॉडलिंग शोचा देखील भाग होती.

२०१९ मध्ये आलेला ‘काला शाह काला’ या चित्रपटपासून ती अभिनय क्षेत्रात आली. या चित्रपटात शेहनाझ सोबत बिन्नू ढिल्लों आणि सरगुन मेहता यांनी काम केले आहे. गायिका म्हणून देखील शेहनाझने नाव कामावले आहे. बिग बॉस शो केल्यानंतर शेहनाझचे नशीब पूर्ण बदलले. यानंतर ती सोशल मीडियावर सगळीकडे फेमस झाली आणि आता इंस्टाग्रामवर लाखो लोक तिला फॉलो करतात.

शेहनाझची करोडोची संपत्ती – आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, शेहनाझ इंस्टग्राम पोस्ट करण्यासाठी ८ ते १० लाख रुपये घेते. टीव्ही, चित्रपट, जाहिराती यातून शेहनाझ भरपूर पैसे कमवते. शेहनाझला वेगवेगळ्या गाडयांची खूप आवड आहे. शेहनाझ कडे सध्या दोन करोड रुपयाची Mercedes-Benz S-Class, १.२ करोडची Jaguar XJ आणि ६५ लाखाची Range Rover आहे.

शेहनाझने खूप कमी वयातच चांगली प्रगती केली आहे. शेहनाझकडील एकूण संपत्तीचा विचार केला तर ३० करोडपर्यंत तिची संपत्ती आहे. बिग बॉसमध्ये सलमान खान सोबत सुद्धा तिची चांगली गट्टी होती. यामुळेच ती आता ‘किसीका भाई, किसीकी जान’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत नाही पण चित्रपटाचा एक भाग आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !