Headlines

बॉलिवूड मधील करोडो रुपयांची संपत्ती असलेले अभिनेते बहिणीला राखी पौर्णिमेला देतात तब्बल एवढी ओवाळणी !

बॉलिवूडमधील कलाकार म्हटलं की कला, अभिनय, ग्लॅमर आणि श्रीमंती आलीच. सर्वच कलाकार आपल्या सर्वांप्रमाणे कमी अधिक प्रमाणात सण समारंभ साजरे करत असतात. तसंच आता बहीण भावाच्या नात्याचा एक सण होऊन गेला तो म्हणजे रक्षाबंधन. तर चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी करोडो रुपये मानधन स्वीकारणारे हे कलाकार रक्षाबंधनाला आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून देतात या अशा गोष्टी, पाहूया तर मग या सुपरस्टार भावांच्या बहिणीला ओवाळणी म्हणून काय बरं मिळतं……

सैफ अली खान – पहिलं नाव पतौडी घराण्याचे वारस आणि बॉलिवूडचे नवाब सैफ अली खानचे आहे. सैफ हे बॉलिवूडमधील एक मोठे नाव आहे. त्यांच्याकडे सुमारे १३०० कोटी रुपयांची यांची संपत्ती आहे. त्याची बॉलीवूड कारकीर्द खूप चांगली राहिली आहे. त्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. या चित्रपटांतून बक्कळ कमाईही झाली आहे. सैफला दोन बहिणी आहेत. पहिली सोहा अली खान आणि दुसरी सबा अली खान.

सोहा अली खान ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोहाने अनेक बॉलिवूड मधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. दुसरीकडे, सबा अली खान एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. सैफ अली खान त्याच्या दोन्ही बहिणींच्या खूप जवळ आहे. तिन्ही भाऊ-बहीण एकमेकांवर खूप प्रेम, माया करतात. सैफ अनेकदा राखीवर आपल्या बहिणींना महागड्या भेटवस्तू देत असतो. उदाहरणार्थ, गेल्या रक्षाबंधनाला सैफने बहिणीला हिऱ्याचे झुमके दिले. त्याची किंमत सुमारे ३० लाख रुपये होती.

सलमान खान – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी पैकी एक आणि आपल्या वेगळ्याच अंदाजाने सर्वांना आपली भुरळ पाडणारा अभिनेता म्हणजे सलमान खान. त्याला दोन बहिणी आहेत. एक अर्पिता खान आणि दुसरी अलविरा खान अग्निहोत्री. यामध्ये अर्पिता ही सलमानची मानलेली बहिण आहे. तिला सलमानचे वडील सलीम खान यांनी दत्तक घेतले होते. सलमानही अर्पितावर त्याची खरी बहीण अलविराइतकेच प्रेम करतो. सलमान खानची संपत्ती ३००० कोटींहून अधिक आहे. एका चित्रपटासाठी तो ६० कोटींहून अधिक मानधन घेतो.

रक्षाबंधनाला सलमान आपल्या बहिणींना खूप महागडे गिफ्ट देतो. उदाहरणार्थ, सलमानने आपल्या दोन्ही बहिणींना राखीनिमित्त प्रत्येकी एक फ्लॅट भेट दिला. हे फ्लॅट मुंबईतील वांद्रे परिसरात होते. हा परिसर मुंबईचा अत्यंत प्रतिष्ठित भाग असल्याचं म्हटलं जातं. आता तुम्ही अंदाज लावू शकता की या फ्लॅट्सची किंमत किती करोडोंमध्ये असेल.

हृतिक रोशन – बॉलिवूडमधील हॅन्डसम हंक आणि चॉकलेट बॉय म्हणजे हृतिक रोशन. त्याच्या डांसिंगचे पण अनेक जण चाहते आहेत. ऋतिकने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. त्याच्या एका चित्रपटाची फी ७५ कोटींच्या घरात जाते. त्यांची एकूण संपत्ती ७०० कोटींहून अधिक आहे. हृतिकच्या बहिणीचे नाव सुनैना रोशन आहे. या दोन भावंडांमध्ये खूप प्रेम आहे. दोघेही दरवर्षी राखीरक्षाबंधन मोठ्या थाटामाटात साजरी करतात.

राखीवर बहिणीला महागडे गिफ्ट देण्यासाठीही हृतिक ओळखला जातो. गतवर्षी हृतिकने राखीसाठी त्याची बहीण सुनैना हिला चार लाख रुपयांची हॅण्ड बॅग दिली होती. आता आपणास यावरून अंदाज येईल की ते आपल्या नातेवाईकांवर किती खुलेआम खर्च करतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !