Headlines

मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील या दिग्गज अभिनेत्याचे या कारणामुळे अचानक निधन !

सरफरोश, गांधी, वास्तव या चित्रपटातील भूमिकांमुळे विशेष लोकप्रियता मिळवलेले ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी आपल्या विलेपार्ले येथील राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला.

सुनील यांना रात्री चक्कर आली होती. त्यामुळे त्यांच्या शरीरात अंतर्गत र’क्त’स्त्रा’व झाल्याची माहिती त्यांच्या घरच्यांनी दिली. त्यांच्यावर आज दुपारी पारशीवाडा येथील हिंदू स्मशाणात अंतिमसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुलं, सुना आणि नातवंडे आहेत.

अभिनेता सुनील शेंडे यांनी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत विविध भूमिका साकारल्या होत्या. 90 च्या दशकात त्यांनी निवडुंग, मधुचंद्राची रात्र, जसा बाप तशी पोर, ईश्वर, नरसिम्हा यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केले होते.

सुनील शेंडे यांच्या अशा अचानक निघून जाण्यामुळे त्यांच्या चाहत्यांना तसेच मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्याच्यांच एका जवळच्या मित्राने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “हिंदी आणि मराठीत अभिनय करणारे प्रसिद्ध अभिनेते सुनील शिंदे यांचे आज निधन झाले.

गांधी चित्रपटात छोटी भूमिका केल्यानंतर त्यांनी 80 आणि 90 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक लहान पण महत्त्वाच्या भूमिका केल्या. सर्कसमधील बाबूजी या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !