Headlines

मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खानच्या लालसिंग चड्डा चित्रपटाचा ट्रेलर पाहून लोक संतापले, म्हणाले …

सध्या अनेक विविध विषय हाताळत नवनवे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. सोबतच आमिर खानचा बहुप्रतिक्षित असा लाल सिंग चड्डा नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. २०१८ नंतर आमिर खान पुन्हा एकदा पद्ययावर दिसणार असल्याने सर्वच जण या चित्रपटाची वाट पाहत आहेत. आतापर्यंत अनेकांनी हा ट्रेलर पाहिला असेल. हा ट्रेलर पाहताच प्रेक्षकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. लोकांचा संताप वाढत ते म्हणाले हा चित्रपट ही आम्ही पाहणार नाही.

आमिर खान आणि करीना कपूर यांचा बहुचर्चित सिनेमा हा वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार होता परंतु काही कारणास्तव तो ऑगस्टपर्यंत ढकलण्यात आला. चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी पडद्यावर येणार आहे. या चित्रपटामध्ये आमिर खान, करीना कपूर, मोना सिंग हे कलाकार दिसणार आहेत. तर दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा आहे.

अमीर खानचा हा चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असल्याने आणि ट्रेलर पाहत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी #boycottlalsinghchaddha हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे. सोबतच इतर काही नेटकऱ्यांच्या कमेंट्स आपण खाली वाचूया.

ट्रेलरबद्दल ट्विट करताना एका नेटकऱ्याने लिहिले, ‘फॉरेस्ट गंप’ मध्ये थोडा ‘धूम 3’ मिक्स केला, स्वादानुसार ‘पीके स्टोरी लाइन आणि अभिनय’, हा घ्या “#लालसिंहचड्डा” सिनेमा तयार. #AamirKhan भावा आम्ही लोकं ch#t! दिसत आहोत का??”- तर दुसऱ्याने, “#रक्षाबंधन चित्रपटाचे फायदे आहेत:-“असे लिहीले आहे. , – यात #Akshay Kumar मेन लीड आहे , मूळ कथा – दिग्दर्शक म्हणून आनंद एल. राय (सर्वोत्कृष्ट कथा सांगणारे). – कमकुवत चित्रपट #LaalSinghCaddha सोबत टक्कर, ज्यात स्टारडमलेस स्टार आहे.

– एका नेटकऱ्याने तर ट्विट केले की, “मी प्रार्थना करतो की टॉम हँक्सला ‘लाल सिंग चड्ढा’ चा ट्रेलर बघायला मिळू नये. फॉरेस्स्त गम्पच्या पात्राची वाईट अवस्था पाहून टॉम भाई आत्महत्या करतील. ओव्हर एक्टिंला एक मर्यादा असते तिच आमिर खानने ओलांडली असल्याचे लिहिले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा!