Headlines

में झुकेगा नही म्हणणाऱ्या पुष्पाने नाकारली करोडो रुपयांची गुटख्याची जाहिरात, मात्र अक्षय कुमारने घेतला हा निर्णय !

काही गोष्टी शरीरासाठी हानिकारक असतात हे माहित असुन देखील त्या विकल्या जातात. तसेच त्या विकण्यासाठी वेगवेगळ्या सेलिब्रेटींकडुन त्यांची मार्केटींग करुन घेतली जाते. या प्रकरणी अजय देवगण आणि शाहरुख खानला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. आता ही वेळ अभिनेता अक्षय कुमारवर आली आहे. या संबधी अक्षयने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून माफी मागितली आहे.

या मध्ये त्याने लिहीले आहे की, मला माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागायची आहे. गेल्या काही दिवसांतील चाहत्यांच्या प्रतिक्रियांनी मी हादरून गेलो आहे. मी तंबाखूचे समर्थन करत नाही. विमल इलायची यांच्याशी माझा काहीही संबंध नाही.

पुढे तो म्हणाला की, मी पूर्ण नम्रतेने यातून माघार घेत आहे. तसेच या जाहिरातीतून मिळालेले सर्व पैसे मी चांगल्या कामासाठी वापरण्याचे ठरवले आहे. कायदेशीर कारणांमुळे, ही जाहिरात काही वेळेसाठी प्रसारित करण्याचा करार आहे. पण यापुढे मी काळजी घेईल असे वचन देतो.

मुलाखतीत अक्षयने सांगितले कि गुटखा कंपन्या त्याला त्यांच्या जाहिरातीत काम करण्यासाठी करोडो रुपये देतात. पण मी त्या कधीच स्विकारत नाही.

अक्षय प्रमाणेच टॉलिवुड अभिनेता अल्लु अर्जुनन पण तंबाखु कंपनीच्या जाहिराती नाकरल्या. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या विषयी कौतुका्ंचा वर्षाव झाला. मिळालेल्या माहितीनुसार या जाहिरातीसाठी अल्लुला कोट्यावधी रुपये ऑफर केले होते परंतु तो त्याच्या तत्वांवर ठाम होता आणि ती ऑफर नाकारली. अल्लूला त्याच्या चाहत्यांमध्ये कोणत्याही चुकीच्या गोष्टीचा प्रचार करायचा नाही. असे स्वत: अल्लू अर्जुन याने सांगतिले.

काही दिवसांपुर्वी बिगबी अमिताभ बच्चन यांना देखील अशा जाहिरातींमुळे ट्रोल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे वाढदिवसाचे औचित्य साधुन ते ती जाहिरात सोडत असल्याचे जाहिर केले. या जाहिराती सरोगेट जाहिरातींच्या अतंर्गत येतात हे त्यांना माहित नव्हते असे त्यांनी सांगितले. अमिताभ यांनी त्या ब्रॅंड सोबतचा करार ताबोडतोब संपवला आणि त्यांचे पैसे परत केले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !