या मुलीने अक्षय अमीर आणि सलमान सोबत केली आहेत काम, लग्नानंतर मात्र झाली गायब !

bollyreport
2 Min Read

आज बालदिन आहे. लहानपणी मुलं निरागसतेने मी मोठं झाल्यावर हे होणार ते होणार असं अगदी सहज म्हणतात. पुढे ते त्यांच्या ध्येयासाठी झटतात सुद्धा. पण काही वेळेस खट्याळ अवखळ वाटणारी मुलं मोठी होऊन आपल्या आईवडीलांचे नाव मानाने उंचावतात.

इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर होत असतात. इरव्ही ग्लॅमरस अंदाजात व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये कधी चुकुन त्यांच्या बालपणीचे फोटो व्हायरल झाले तर ते कलाकार कोण हे ओळखणे मुश्किल होते. आज आम्ही तुम्हाला साऊथ आणि बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा फोटो दाखवणार आहोत.

फोटोत दिसणारी ही लहान मुलगी बॉलिवूड आणि साऊथची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मोठे होऊन अक्षय कुमार, सलमान खान, आमिर खान यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत ऑनस्क्रिन रोमान्स केला आहे.मात्र आपल्या लग्नानंतर ती इंडस्ट्रीतून नाहीशीच झाली.

फोटोतील अभिनेत्रीचे नाव आहे असिन. असिन हिने आपल्या फिल्मी करीअरमध्ये खूप नाव कमावले. साऊथमध्ये ती खूप लोकप्रिय होती. त्यानंतर तिने आपला मोर्चा हिंदीकडे वळवला. तिथेही तिने सुपरस्टार्ससोबत काम केले. आमिर खानसोबतच्या गजनी या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2009मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.


त्यानंतर ती सलमान खानसोबतच्या रेडी या चित्रपटात दिसली. हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. तोसुद्धा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्यानंतर असिनने अक्षय कुमारसोबत गब्बर इज बैक, बोल बच्चन,ऑल इज वेल या चित्रपटांमध्ये काम केले.

असिनचा जन्म 26 ऑक्टोबर 1985 मध्ये केरळ येथील कोचीमध्ये झाला. तिने 2001मध्ये चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. पुढे तिने 2016 मध्य बिझनेसमन राहुल शर्मासोबत लग्न केले. या दोघांची ओळख अक्षय कुमारमुळे झाली होती. आता असिन एका गोड मुलीची आई आहे. तिच्या मुलीचे नाव अरिन असे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.