रणबीर कपूरने सांगितले बेडरूम मधील त्या गोष्टी, आलियाला झोपताना … , वाचून तुम्ही थक्क व्हाल !

bollyreport
3 Min Read

सध्या रणबीर आणि आलिया कपूरची जोडी खूप चर्चेत असते. त्यामागचे कारण म्हणजे ते लवकरच आईबाबा होणार आहेत आणि दुसरे कारण म्हणजे त्याच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या जोडप्याने एप्रिल महिन्यात एकमेकांशी विवाहगाठ बांधली त्यानंतर हे वेगवेगळ्या प्रमोशन दरम्यान किंवा कार्यक्रमात ते एकत्रच जातात. कॅमेऱ्यासमोर सुद्धा दोघेही रोमॅंटीक पोज देत असतात

इंडस्ट्रीमध्ये बॉयकॉटचा ट्रेंड चालू असताना सुद्धा ब्रह्मास्त्र चित्रपटाने चांगली कमाई केल्यामुळे हे कपल सध्या खूप चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाने आतापर्यंत ४५० करोडचा टप्पा पार केला आहे. मात्र अजूनही अनेक लोक हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी करत आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रणबीर आणि आलियाने अनेकदा आपले वैयक्तिक आयुष्य आपल्या चाहत्यांशी शेअर केले. त्यावेळी रणबीरने एकदा आलियासंबंधी एक खुलासा केला होता. आलिया सोबत झोपताना रणबीरला किती त्रास सहन करावा लागतो हे त्याने सांगितलं. चला तर जाणून घेऊया आलियाच्या काही सवयी.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूर ला त्याच्या पत्नीच्या म्हणजेच आलिया भटच्या काही सवयी विचारल्या. त्यावेळी तो म्हणाला की आलियाची स्लीपिंग पोझिशन खूप विचित्र आहे. रात्री ती बेडवर पूर्ण हात पाय पसरून झोपते त्यामुळे मला एका कॉर्नरला झोपावे लागते. आलियाच्या या सवयीमुळे मला रोज झोपताना स्ट्रगल करावे लागते.

रणबीर सोबतच आलियाने सुद्धा त्याची एक वाईट सवय सांगितली. ती म्हणाली की मला रणबीर ची शांतता आवडते. तो माझ्या सर्व गोष्टी शांतपणे ऐकतो. पण काही वेळेस मला असे वाटते की, महत्त्वाच्या ठिकाणी त्याने बोलणे जरुरी असते पण तो त्यावेळी सुद्धा गप्प राहतो. अशावेळी त्याची शांतता मला त्रास देते.

रणबीर आणि आलिया चे १४ एप्रिल ला लग्न झाले होते. त्याआधी पाच वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केले. सध्या आलिया तिचा गरोदरपणाचा काळ आनंदात घालवत आहे.


या दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ब्रह्मास्त्र नंतर ही जोडी ऍनिमल या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना सुद्धा असेल. याशिवाय रणबीर श्रद्धा कपूर सोबत सुद्धा एका आगामी चित्रपटात दिसणार आहे.

तर आलिया लवकरच रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात सुपरस्टार रणवीर सिंह सोबत दिसणार आहे. तसेच तिने नुकताच तिचा पहिला वहिला हॉलीवुड चित्रपट हार्ट ऑफ स्टोनचे पोस्टर शेअर केले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.