रणवीर सिंग नंतर आता आलिया भट्टचे ओपन फोटोशूट, गळ्यात फक्त स्कार्प घालून काढले तसे फोटो !

bollyreport
2 Min Read

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. तिने काही एप्रिलमध्ये अभिनेता रणबीरसोबत लग्न केले. त्यानंतर तिने दोन महिन्यातच तिने गोड बातमी दिल्यामुळे ती चर्चेत आली. काही दिवसांपूर्वीच ती तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे म्हणजे हार्ट ऑफ स्टोनचे शूटिंग संपून मुंबईत परतली. पण परतल्यावर लगेचच तिने तिच्या कामाला सुरुवात केली.

अनेकांनी तिला तु गरोदर आहेस तरी इतका काम का करतेस असे प्रश्न केले मात्र त्यावर तिने मला काम करतानाच खूप बरे वाटते असे सांगितले. सध्या ती तिच्या डार्लिंग्स या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ५ ऑगस्टला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत होती.

त्यावेळी ती तिच्या वेगवेगळ्या स्टाइलिश अंदाजात पाहायला मिळाली. अनेकदा तिने सफाइने तिचे बेबी बंप लपवले. चाहत्यांनी तिच्या प्रत्येक लूकचे मनभरुन कौतुक केले.

काही दिवसांपूर्वीच आलियाने डब्बू रतनानीसाठी फोटोशूट केले होते. या शूटमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. तिचा तो लूक चाहत्यांना खूप आवडला. या फोटोला तिची नंणद रिद्धीमा कपूरने देखील कमेंट दिली. डब्बू रतनानी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dabboo Ratnani (@dabbooratnani)


या फोटोत आलिया टॉपलेस असून तिने तिच्या शरीराभोवती सोनेरी रंगाचा स्कार्फ लपेटला आहे. या फोटोला डब्बू रतनानीने गोल़्डन आलिया भट्ट असे कॅप्शन दिले आहे. पण हे फोटो पाहिल्यावर ते शूट जुने असल्याचे दिसते कारण आलिया सध्या गरोदर आहे पण त्या फोटोमध्ये मात्र तसे काहीच दिसत नाही.

आलियाने तिच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचे शूटिंग संपवले आहे. या चित्रपटात ती रणवीर सिंहसोबत दिसणार आहे. लवकरच तिचा ब्र’म्हा’स्त्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच आपला पती रणबीर कपूर सोबत स्किन शेअर करणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.