Headlines

शूटिंग दरम्यान दीपिकाला कसली तरी भीती वाटल्याने ती खूप घाबरली त्यामुऴे तिच्या ह्रदयाचे ठोके…. !

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि साउथकडील सुपरस्टार आभास यांचा आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट’चे शूटिंग सध्या हैदराबाद येथील रामोजी राव फिल्म सिटीमध्ये चालू आहे. पण शूटींग दरम्यान दीपिकाची तब्येत अचानक बिघडली आणि तिला तिथल्याच हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. हैदराबादच्या कमिनेन हॉस्पिटलमध्ये सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

शूटिंग दरम्यान दीपिकाला कसली तरी भीती वाटल्याने ती खूप घाबरली त्यामुऴे तिच्या ह्रदयाचे ठोके जलद गतीने धडकू लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याव्यतिरिक्त डॉक्टरांनी आणखी कोणतीच माहिती दिली नाही. शूटिंग चालु असतानाच तिला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने दीपिकाला तात्काळ हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. आता ती पुन्हा एकदा सेटवर परतल्याचे म्हटले जात आहे.

सेटवर आजारी पडणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये दीपिकाही पहिली सेलिब्रेटी नाही. या अगोदर अभिनेत्री प्रियंका चोप्राला बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या सेटवर चक्कर आली होती. तर कॉमेडी किंग कपिल शर्माला त्याच्या शोमध्ये शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा आले असताना चक्कर आली होती. कामाचा तणाव आणि अस्ताव्यस्त वेळापत्रक यांमुळे चक्कर आल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.

दिपिकाच्या पुढील कामाबद्ल बोलायचे झाल्यास लवकरच ती पठाण या चित्रपटात शाहरुख सोबत दिसणार आहे. याशिवाय ह्रतिक रोशन सोबत ती फायटर या चित्रपटात सुद्धा दिसेल. काही दिवसांपूर्वी दीपिका शकुन बत्राच्या गेहराइयां चित्रपटात दिसली होती. यात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे दिसली होती. तर गेल्या महिन्यात दीपिकाने कान्स फेस्टिव्हलला उपस्थिती लावली. विशेष म्हणजे तिने यावेळी तिथे ज्युरी म्हणून काम केले. तिचे कान्स फेस्टिवलचे फोटो तुफान व्हायरल झाले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !