Headlines

श्रीदेवीने कधीही बोल्डनेसच्या मर्यादा तोडल्या नाहीत पण जान्हवीचा हा बेडरूम मधला फोटो पाहून वेडे व्हाल !

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे. भलेही ती सुपरस्टार श्रीदेवीची लेक असली तरी तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वताचे नाव कमावले आहे. जान्हवी तिच्या करीअरमध्ये अनेक चित्रपटांत काम केले आहे. जान्हवीने मराठी चित्रपट सैराटचा रिमेक असलेल्या धडकमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

सध्या ती तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गुड लक जेरी या चित्रपटामुळे चर्चेत आहे.सध्या ती या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे भारावुन गेली आहे. जान्हवी तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्य आणि हॉटनेससाठी सुद्धा चर्चेत असते. ती बरेचदा स्वताचे बोल्ड फोटो पोस्ट करुन सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते.

सध्या जान्हवीचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोत ती आरशासमोर बसून स्वताचा फोटो काढत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाची स्पोर्टस् ब्रा आणि काळ्या रंगाची शॉर्टस् घातली आहे. या फोटोत ती आपल्या हॉट फिगरचे प्रदर्शन करत आहे. तिने केस मोकळे सोडले असून ती नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. तिच्या चाहत्यांना हा फोटो खूप आवडला आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंटसुद्धा केली आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोत जान्हवी मिरर सेल्फी घेताना जमीनीवर बसली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


जान्हवीच्या कामांबद्दल बोलायचे झाल्यास तिचा गुड लक जेरी 29 जुलैला प्रदर्शित झाला. हा चित्रपट साऊथ सिनेमाचा रिमेक आहे. साऊथच्या सिनेमात नयनताराने प्रमुख भूमिका साकारली होती. गुड लक जेरीमधील जान्हवीचा अभिनय इतका दमदार आहे की तिचा हा चित्रपट तिच्या आतापर्यंतच्या करीअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे.

येत्या काही काळात जान्हवी बवाल या चित्रपटात दिसणार आहे. त्यात तिच्यासोबत अभिनेता वरुण धवन दिसणार आहे. जान्हवी सध्या जन गण मन या चित्रपटासाठी सुद्धा काम करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत साऊथ स्टार विजय देवरकोंडा आणि पुजा हेगडे दिसणार आहेत. यासोबतच ती करण जोहरच्या दोस्ताना २ मध्येही दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !