Headlines

सलमान खानच्या या सवयी मुळे वैतागून गेली होती भाग्यश्री, एकटीला बाजूला नेऊन … !

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. तसे पाहायला गेल्यास सलमानने काम केलेल्या प्रत्येक महिला अभिनेत्रींसोबतची त्याची जोडी खूप गाजली. त्यामध्ये आताच्या कतरीना, सोनाक्षी यांसारख्या अभिनेत्रींपासून ते त्याकाळच्या माधुरी, करिश्मा, भाग्यश्री यांसारख्या अभिनेत्रींसोबतचे चित्रपट हिट झाले होते.

सलमान खान ही सहअभिनेत्रींसोबत चांगल्या वर्तवणूकीसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र 1989 मध्ये आलेल्या मैने प्यार किया या चित्रपटातील अभिनेत्री भाग्यश्रीच्या बाबतीत थोडे वेगळेच घडले.

असे म्हटले जाते की, भाग्यश्रीने सलमान खानला मैने प्यार कियाच्या शूटिंगदरम्यान स्वतापासून दूर राहण्यास सांगितले होते. खरेतर चित्रपट रिलीज झाल्यावर ही जोडी सर्वांना खूप आवडली. मात्र चित्रीकरणादरम्यान त्यांच्यात खूप बाचाबाची झाली होती. याबबातचा खुलासा भाग्यश्रीने एका मुलाखतीत केला.

गेली अनेक वर्षे भाग्यश्री आणि सलमानने एकत्र काम केलेले नाही. मात्र त्यांची जोडी आजही प्रेक्षकांना खूप आवडते. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखती भाग्यश्रीने सांगितले की, दिल दिवाना या गाण्याच्या शूटिंगवेळी सलमान खान हा पहिला व्यक्ती होता ज्याला माझ्या आणि हिमालयच्या नात्याबद्दल समजले होते. त्यामुळे तो सतत माझ्या पाठी गाणी गुणगुणत फिरायचा.

भाग्यश्री पुढे म्हणाली की, मी त्याला त्यावेळी सतत तंबी द्यायचे की तू असा फिरु नकोस नाहीतर लोक आपल्या दोघांबद्दल बोलायला सुरुवात करतील. पण तरी तो ऐकायचा नाही. मला सारखा त्रास देत राहायचा. आणि मग त्याने मला त्याला हिमालयबद्दल सर्व माहित असल्याचे सांगितले.

त्यानेच मला हिमालयला सेटवर बोलवण्यास सांगितले होते. त्यानंतर जेव्हा त्यांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा ते एकदम छान गप्पा मारत होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !