Headlines

सलमान खान आहे १७ वर्षाच्या मुलीचा बाप आणि बायको राहते दुबई मध्ये ? अरबाजच्या प्रश्नामुळे सलमानची लागली वाट !

सलमान खान म्हटलं की चर्चा या होतातच. मग त्याचा चित्रपट असो किंवा त्याची लक्झरी लाइफ. तो कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे लाइम लाइटमध्ये असतो. सलमान खानच्या बाबतीत सर्वात चर्चिला जाणारा विषय म्हणजे त्याचे लग्न. जग इकडचे तिकडे झाले पण सलमान खान ने लग्न काही केले नाही. त्याच्या मागून आलेल्या कलाकारांना मुले देखील झाली मात्रा सलमान खान अजूनही अविवाहितच आहे. पण आता सलमान खान च्या बाबतीत खळबळजनक गोष्ट समोर आली आहे.

अरबाज खानचा टॉक शो पिंच २च्या प्रीमियर मध्ये त्याचा भाऊ सलमान खान पाहुणा म्हणून गेला होता. २१ जुलैपासून हा शो सुरू झाला आहे. या शोमध्ये अरबाज ने सलमान ला असे काही प्रश्न विचारले ज्यामुळे तो गोत्यात आला आहे.
या शोच्या फॉरमॅट नुसार लोकांचे ट्विट वाचून गेस्ट ला सांगायचे असतात. सांगितले की सोशल मीडियावर यासाठी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला मात्र एका युजरने सलमानची सिक्रेट फॅमिली असून त्याची पत्नी आणि १७ वर्षांची मुलगी दुबईत राहते असे म्हटले आहे.

अरबाज खानने वाचलेल्या कमेंट मध्ये असे लिहिले होते की, कुठे लपून बसला आहेस घाबरट! भारतात सगळ्यांना माहित आहे की दुबईमध्ये तू तुझी पत्नी नूर आणि १७ वर्षांची मुलगी सोबत राहतोस. भारतीयांना अजुन किती दिवस मूर्ख बनवशील? ही कमेंट ऐकून सुरुवातीला सलमान खान सुरुवातीला हैराण झाला. आणि नंतर हे कोणासाठी आहे असे त्याने विचारले.

त्यावर अरबाजने ही कमेंट तुझ्यासाठीच असल्याचे सलमानला सांगितले. यावर सलमान म्हणाला की, या लोकांना खूप काही माहित आहे. या सर्व गोष्टी बकवास आहेत. मला माहित नाही की हे कोणा बद्दल बोलले जात आहे आणि कुठे पोस्ट केले आहे. माझी कोणीच पत्नी नाही. मी भारतात गॅलक्सी अपार्टमेंट मध्ये नऊ वर्षाचा असल्यापासून राहतो. त्यामुळे मला या माणसाला उत्तर द्यावेसे वाटत नाही. संपूर्ण भारताला माहित आहे की मी कुठे राहतो.

पिंच २ मध्ये अरबाज पाहुणे – अनन्या पांडे, कियारा आडवाणी, फरहान अख्तर, टायगर श्रॉफ राजकुमार राव आणि फराह खान यांच्यासोबत दिसणार आहे. एका इंटरव्यू मध्ये पिंचचा दुसरा सिजन खूप मोठा आणि बोल्ड होणार असल्याचे अरबाज ने सांगितले होते. शोचा पहिला सीजन अरबाजच्या अटींप्रमाणे यशस्वी होण्यासाठी पहिल्या सीझनमध्ये सलमान खान ला जाणून बुजून बोलवले नव्हते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !