Headlines

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री सामंथाने शाहरुख खान सोबत चित्रपट करण्यास दिला नकार !

बॉलिवूडमध्ये रोमान्सचा किंग शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करण्याचा संधी कोण सोडेल. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या शाहरुखसोबत काम करण्यासाठी तरसत असतात. पण सध्याची आघाडीची दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथाही ने ती ऑफर नाकारली. दाक्षिणात्य कलाकार समंथा प्रभू ही आज चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यसोबत ये माया चेसावे या तेलगू चित्रपटातून पदार्पण केले . तेव्हापासून तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

समंथाने गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. द फॅमिली मॅन 2 या वेब सिरीज द्वारे तिने बॉलिवूड प्रेक्षकांची मने जिंकली . तिचा दमदार अभिनय पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिला आणखी हिंदी चित्रपटांमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या डेब्यू रिलीजनंतर समांथाने आणखी काही बॉलिवूड प्रोजेक्ट साइन केल्याच्या अनेक बातम्या व्हायरल झाल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, बॉलीवूड किंग शाहरुखचा नवा चित्रपट ‘जवान’मध्ये त्याच्या सोबत मुख्य भूमिकेसाठी सामंथाला संपर्क साधण्यात आला होता. मात्र, सामंथाने ही ऑफर नाकारली. अ‍ॅटली दिग्दर्शित आणि गौरी खान निर्मित हा एक बहुभाषिक चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. असे म्हणतात की या चित्रपटाची ऑफर समांथाला आली जेव्हा ती तिचा पती आणि अभिनेता नागा चैतन्यसोबत फॅमिली प्लॅनिंग करत होती आणि त्यामुळे चित्रपट न घेणेच योग्य ठरेल परंतु तेव्हा काही काळानंतर दोघांनी घ’ट’स्फो’ट घेतला.

तिने नकार दिल्यानंतर, जवान हा चित्रपट नयनताराकडे गेला जी आता शाहरुख सोबत लीडची भूमिका करत आहे. त्यांच्यासोबत या चित्रपटात सान्या मल्होत्रा ​​आणि सुनील ग्रोव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
जवान चित्रपट जरी नाकारला तरी समंथाकडे खूप चित्रपट आहेत. काही दिवसांनी ती शंकुंतलम आणि यशोदा या चित्रपटात दिसणार आहे. राज आणि डीके दिग्दर्शित असलेल्या इंडियन लेग ऑफ सिटाडेलसाठी देखील सुध्दा समंथा ला घेण्यात आले आहे.

जवान बद्दल बोलायचे तर, चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा शुक्रवारी एका टीझरसह करण्यात आली ज्याची इंटरनेटवर तुफान चर्चा होत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !