एके काळची विश्वसुंदरी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या कारकिर्दीत अनेक हीट चित्रपट दिले. ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून , अभिषेक बच्चनची बायको आणि अमिताभ आणि जया बच्चनची सून आहे. सध्या ती चित्रपटांपासून जरी दूर असली तरी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्याने तिच्या आणि अभिषेकच्या लग्नानंतरचा पहिल्या रात्रीचा किस्सा सांगितला.
ऐश्वर्याने सांगितले की , अभिषेक माझे सगळे म्हणणे ऐकतो. तुम्हाला वाटत असेल आमच्यात बिनसल्यावर अभिषेक माझी माफी मागत असेल पण तसे नाही. जेव्हा तो खूप रागात असतो तेव्हा मलाच त्याची माफी मागावी लागते. ऐश्वर्याने पुढे सांगितले की , जेव्हा त्यांची सुहागरात होती तेव्हा खूप वेळ मी अभिषेकची वाट बघत बसले होते.
त्यानंतर खूप वेळाने अभिषेक खोलीत आला. मी त्याला विचारले की तु कुठे होतास इतका वेळ तेव्हा तो मला बघून हसायला लागला. त्यावेळी मला त्याचा खूप राग आला. माझा राग पाहुन तो मस्करीत मला म्हणाला की ये मला मार.. तेव्हा मीपण मिळालेल्या संधीचा फायदा घेत त्याला मस्करीत मारले. त्याच्या अशा मजेदार बोलण्याने माझे मन जिंकले होते. आणि माझा राग ही शांत झाला.
ऐश्वर्या आणि अभिषेकचा हा मजेशीर किस्सा सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. गुरु या चित्रपटाच्या शूटिंगवेळी अभिषेकने ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केलेल. ते प्रपोजल ऐश्वर्याने स्विकारलं आणि दोघांनी लग्न केलं.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !