Headlines

स्वतःपेक्षा ९ वर्ष छोट्या रणवीर सोबत हॉट सीन दिल्यामुळे ऐश्वर्यावर अमिताभ आणि जया बच्चन … !

बॉलिवूडमधील एक सगळ्यात सुंदर आणि नावाजलेली अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. अशी एकही व्यक्ती भेटणार नाही ज्याला ऐश्वर्याला माहित नाही. ऐश्वर्या एक नामवंत मॉडल आणि अभिनेत्री आहे. तिने तिच्या कलेने आणि अभिनयाने इंडस्ट्रिमध्ये नाव कमावले आहे.

ऐश्वर्या रायच्या सुंदरतेचे आणि अभिनयाचे फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील भरपूर फॅन्स आहेत. सगळीकडे तिच्या सुंदरतेची चर्चा होत असते. ऐश्वर्याने खूप हिट फिल्म केल्या आहेत. ज्यात तिने प्रत्येक वेळेस वेगवेगळे रोल केले आहेत.

ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चन सोबत लग्न केल्यावर ती बच्चन परिवाराची सून बनली. आई झाल्यावर सुद्धा जेव्हा तिने पुन्हा काम सुरु करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सगळेच तिला पुन्हा सिल्व्हर स्क्रिनवर पाहण्यासाठी उत्सुक होते. पण ज्या पद्धतीने ऐश्वर्याने पुन्हा तिच्या कामाला सुरुवात केली ते तिच्या परिवाराला जास्त आवडले नाही. यामुळे त्यांच्या घरामध्ये भांडणं व्हायला देखील सुरुवात झाली. ऐश्वर्याच्या सासरच्या लोकांना तिचे हे काम अजिबात आवडले नाही.

‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातील ऐश्वर्या आणि रणबीरची केमिस्ट्री सगळ्यांनाच खूप आवडली. त्यांनी आपल्या अभिनयाने सगळ्यांचेच लक्ष त्यांच्याकडे खेचून घेतले. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा ऐश्वर्याच्या घरातल्यांना हा मोठा शॉक होता. चित्रपटाच्या टीझर रिलीजच्या वेळेस ऐश्वर्याच्या सासरकडचे करन जोहरवर खूप नाराज झाले होते. बच्चन परिवाराने करण जोहरवर यावेळेस विशेष राग व्यक्त केला होता.

मिळालेल्या रिपोर्ट नुसार नाराज होण्याचे एकच कारण होते ते म्हणजे रणबीर ऐश्वर्या पेक्षा बराच लहान आहे. तरीही त्यांचे एवढे हॉट सिन या चित्रपटात घेतले गेले. अमिताभ बच्चन या वेळेस खूप रागावले होते. यामुळेच चित्रपटातून अनेक इन्टीमेट सिन काढून टाकण्यात आले.

यामध्ये चित्रपटात ऐश्वर्याचा लिपलॉक सिन देखील होता. हा चित्रपट रिलीज होण्याआधी रणबीर आणि ऐश्वर्याने एक फोटोशूट देखील केले होते. हे फोटोशूट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले होते ज्यामधील त्यांची केमिस्ट्री पाहून सगळेच हैराण झाले होते.

मीडिया रिपोर्ट नुसार जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांना ऐश्वर्याचे हे काम मुळीच आवडले नाही. हा त्यांचा राग त्यांनी ऐश्वर्याला देखील बोलून दाखवला होता. ते तिच्यावर देखील रागावले होते. पण ऐश्वर्याला यामध्ये काहीच चुकीचे वाटत नव्हते त्यामुळे त्यांच्यामध्ये आणखी वाद झाले. कोणालाच एकमेकांची मत पटत नव्हती दोघेही आपल्या म्हणण्यावर ठाम होते. कोणीच हार मानायला तयार नसल्याने त्यांच्यामधील वाद वाढत होते. त्यामुळे ते मीडियाच्या देखील नजरेत आले.

‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात काम केल्यानंतर ऐश्वर्याने नंतर पुन्हा कधीच असे काम केले नाही. किंवा असे व्हिडीओ देखील आले नाहीत. ‘ऐ दिल है मुश्किल’ या नंतर ऐश्वर्याने फन्ने खां मध्ये काम केले होते. हल्लीच ऐश्वर्याचा नवीन चित्रपट रिलीज झाला आहे ‘पोन्नियिन सेलवन’ जो बॉक्सऑफिसवर खूप चालत आहे.

हा तमीळ भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे. हा चित्रपट महाप्रतापी चोल राजा अरुलमोरीवर्मन यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, जयम रवि, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धूलिपाला,आर सरथकुमार, विक्रम प्रभु यांनी देखील काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !