Headlines

स्विमिंग पूल मध्ये कतरीना आणि विकी कौशलचा बोल्ड फोटोशूट, लोक म्हणाले सलमानला टॅग करा !

बॉलिवुडचे सध्याचे बहुचर्चित कपल म्हणजे अभिनेत्री कॅटरिना कॅफ आणि अभिनेता विकी कौशल. या दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा थांगपत्ता देखील कोणाला नव्हता मात्र अचानक नोव्हेंबर महिन्यात ते दोघे लग्न करत असल्याच्या चर्चांना उधाण आले. आणि अचानक त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यांच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला. त्यांच्या लग्नानंतर त्यांचे चाहते त्यांचे एकत्र फोटो पाहण्यासाठी उत्सुक असतात.

नुकताच कॅटरिनाने तिच्या नवऱ्यासोबत स्विमिंगपुलमधला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघेही खुप रोमॅण्टीक अंदाजात दिसत आहे.

या फोटोत कॅट पांढऱ्या स्विमसुट मध्ये दिसत आहे तर विकी शर्टलेस आहे. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आहे. सध्या या फोटो ने इन्स्टाग्रामवर धुमाकुळ घातला आहे. यात कमेंट सेक्शन मध्ये पण खुप मजेदार कमेंटदेखील आल्या आहेत. यात एका युजरने लिहीले आहे की कोणीतरी हा फोटो सलमानभाईला टॅग करा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

“>
तर एकाने विकी कौशल तर्फे कमेंट करत म्हटले आहे की तुम्ही जळत रहा मी कॅटरिनाला घेऊन गेलो. तर एका युजरने लिहीले आहे कि हे कपल कमाल दिसत आहे. तर खुप साऱ्या युजर्सनी रडायची इमोजी पोस्ट करत विकी कौशल वर जळत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर अनेकांनी सलमानचे नाव पोस्ट केले आहे.

या दोघांच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास दोघांकडे कामाची काही कमी नाही. विकी लवकरच गोविंदा नाम मेरा आणि द ग्रेट इंडियन फैमिली सारख्या चित्रपटात दिसणार आहे. तर प्रेक्षक कॅटरिनाच्या टायगर ३ ची वाट पाहत आहेत. या चित्रपटात सलमान आणि कॅटरिना एकत्र दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !