Headlines

हा प्रसिद्ध अभिनेता आपल्या बायकोला विसरून गर्लफ्रेंड सोबत लग्नाआधीच फक्त राहत नाही तर आहे एका मुलाचा बाप !

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते, अभिनेत्री आहेत ज्यांचं लग्न होऊनसुद्धा ते दुसऱ्यांच्या प्रेमात पडले आहेत. यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे अर्जुन रामपाल.

अर्जुन रामपाल यांचे वादग्रस्त आयुष्य – बॉलिवूडमध्ये किस्से आणि गोष्टी यांना काही कमी नाही. बॉलिवूडमधील अगदी लहानातली लहान गोष्ट देखील वाऱ्यासारखी सगळीकडे पसरते मग ते ब्रेकअप पॅचअप असो किंवा मग लग्न. बॉलिवूड मधील नामवंत अभिनेते अर्जुन रामपाल यांनी आधी एका मॉडल सोबत लग्न केले ती त्यांच्यापेक्षा वयाने मोठी होती.

२० वर्ष त्यांचं हे लग्न टिकलं. त्यानंतर यांना आपल्यापेक्षा वयाने १५ वर्ष लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत प्रेम झाले. अर्जुन आणि ती अभिनेत्री लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. लिव्ह इनमध्ये असतानाच अगदी काही वर्षातच ते लग्नाआधीच वडील झाले.

करिअरच्या सुरुवातीलाच केले लग्न – बॉलिवूडमधील अभिनेता अर्जुन रामपाल यांनी फार कमी चित्रपट केले आहेत. इतके कमी चित्रपट करूनसुद्धा त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. पण अर्जुन रामपाल त्यांच्या वयक्तिक जीवनामुळे जितके फेमस आहेत तितके त्यांच्या अभिनयासाठी देखील नाहीत. अर्जुन रामपालच्या लूकमूळे लाखो मुली त्यांच्या चहत्या होत्या.

अभिनय क्षेत्रामध्ये नाव मिळवण्याआधीच त्यांनी त्यांच्यापेक्षा काही वर्षाने मोठी सुपरमॉडेल मेहर जेसिया हिच्यासोबत लग्न केले. मेहर जेसिया मिस इंडिया या किताबाची मानकरी आहे.

२० वर्षाचा संसार – अर्जुन रामपाल यांनी १९९८ मध्ये मेहर जेसिया सोबत लग्न केले. त्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या मायरा आणि माहिका पण अर्जुनचे हे लग्न फक्त २० वर्ष टिकले. २० वर्षानंतर अर्जुन आणि मेहर यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

मेहर सोबत झालेल्या घ*ट*स्फो*टा*ची बातमी सगळीकडे पसरली असतानाच अफ्रिकेतील मॉडल गैब्रिएला डिमेट्रेड्स हिच्यावर त्यांना प्रेम झाले. यानंतर हे दोघांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. काही वेळातच गैब्रिएला अर्जुनच्या मुलाची आई झाली. अर्जुन आणि गैब्रिएलाचे लग्न झाले नसतानाही त्यांना मुल झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by @rampal72


गैब्रिएलासोबत रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर अर्जुन रामपाल लोकांमध्ये फार कमी येतात. पण ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. आपण त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जर नजर फिरवली तर ते त्यांच्या मुलांवर किती प्रेम करतात हे आपल्या लक्षात येईल. अर्जुन बरेचदा आपल्या मुलांसोबत फिरायला जात असतात.

याआधी ‘धाकड’ या चित्रपटात अर्जुनना पाहायला मिळाले होते. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता ते ‘द बॅटल ऑफ भीमा-कोरेगाव’ या चित्रपटात दिसणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या ‘ना*स्ति*क’ या चित्रपटाचे चित्रीकरण देखील सुरु आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !