बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला इंडस्ट्रीतील सर्वात बिझी अभिनेता म्हटले जाते. एका पाठोपाठ एक चित्रपट साइन केल्यामुळे अनेकदा त्याला ट्रोलही केले जाते. काहीजण तर त्याला मोजके सिनेमे करण्याचा सल्ला सुद्धा देतात. पण या सर्व गोष्टींवर अक्षयने एक वेगळाच खुलासा केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार सर्वात जास्त चित्रपट करुनही तोच जास्त सुट्ट्यांचा आनंद घेत असतो. अक्षयचा सम्राट पृथ्वीराज जूनमध्ये प्रदर्शित झाला होता. आता ऑगस्टमध्ये त्याचा रक्षाबंधन प्रदर्शित होणार आहे.
एका पाठोपाठ एक चित्रपट करण्यासाठी अक्षय प्रसिद्ध आहे. मात्र त्याचे मागील काही चित्रपट फारसे चालले नाहीत. बच्चन पांडे नंतर सम्राट पृथ्वीराज प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्यास अयशस्वी ठरला. त्यामुळे अक्षयला रक्षाबंधन चित्रपटाकडून खूप आशा आहेत.
इ टाइम्स सोबतच्या मुलाखतीत अक्षयने सांगितले की करीअरच्या सुरुवातीच्या दिवसांत लोक मला मी वर्षातून ४ चित्रपट का करतो असे विचारायचे. अनेकदा मला त्यांनी कमी चित्रपट करत जा असे ही सल्ले दिले. पण मी इंडस्ट्रीत इतर लोकांच्या तुलनेत जास्त सुट्ट्या घेतो. तसेच मी रविवारी कधीच काम करत नाही. शिवाय शनिवारी मी अर्धा दिवसच काम करतो.
अक्षयने पुढे सांगितले की, तो चित्रपटाच्या सेटवर ८ तास काम करतो. पण त्यात एक मिनिटसुद्धा व्हॅनिटीमध्ये घालवत नाही. शूटिंग दरम्यान मी चित्रपटाच्या सेटवरच उभा असतो. माझे ८ तास म्हणजे इतर कलाकारांच्या १४ ते १५ तासांसारखे आहेत. अशा प्रकारे माझे माझ्या चित्रपटांशी कमिटमेंट असते.
अक्षय कुमारने आपल्या चित्रपटांबद्दल सांगितले की, मी माझ्या चित्रपटात नेहमी वेगळा विषय शोधतो. मला माझ्या चाहत्यांसमोर एकच इमेज बनवायला आवडत नाही. पण मी चित्रपट करताना ते कौटुंबिक असतील याची काळजी घेतो.
अक्षय कुमारचा रक्षा बंधन ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. यावेळी या चित्रपटाची आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढासोबत स्पर्धा असेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !