Headlines

ट्विंकल नव्हे तर या अभिनेत्रीला आपली बायको बनवायचे होते अक्षय कुमारला, गुप्तपणे लग्न देखील केले होते….

बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकथा आपण ऐकल्या आहेत. काही कथा या पूर्ण झाल्या तर काही अपुऱ्या राहिल्या. शतकानुशतके बॉलिवूडमध्ये प्रेमाचे वारे वाहत आहेत. बॉलिवूडमध्ये अनेक जोडपी होऊन गेली आहेत. त्यापैकी एक जोडपं म्हणजे अक्षय कुमार आणि रविना टंडन.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेता अक्षय कुमार आणि ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री रविना टंडन हिच्या प्रेमात पडला होता. त्या दोघांनी एकमेकांसोबत असलेले नाते देखील स्वीकारले. ९० च्या काळात हे जोडपं चर्चेचा विषय होतं. अशातच खिलाडी कुमारने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये रवीना टंडन व त्याच्या नात्याबद्दल उघडपणे बोलला होते. अक्षय कुमारने त्याच्या एका मुलाखतीत रवीनासोबतच्या नात्याबद्दल काही धक्कादायक खुलासे देखील केले, जे ऐकून आश्चर्यच वाटतं.

रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचे खरोखरच गुप्तपणे लग्न झाले होते का? ९० च्या दशकात अक्षय आणि रवीनाचे प्रेम सगळ्यांचे लक्ष वेधून घेत जोते. चाहते या ऑनस्क्रीन जोडीला खऱ्या आयुष्यातही खूप पसंत करत होते. ही जवळीक पाहता, दोघांनी गुपचूप लग्न केल्याचीही अफवा पसरली होती. त्याचवेळी अक्षय कुमारने आपल्या एका मुलाखतीत या गुप्तपाने केलेल्या लग्नाबद्दल सांगितले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचा १९९८ मध्ये ब्रेकअप झाला, या ब्रेकअपनंतर एका मुलाखतीत अक्षयने त्या गुप्तपाने केलेल्या लग्नाबद्दल खुलासा केला होता. जेव्हा त्याला विचारण्यात आले की तू रवीना टंडनसोबत गुप्तपणे लग्न केले होते का? मग त्याने उत्तर दिले की, रवीनासोबत निश्चितच साखरपुडा झाला होता, पण आम्ही कधीही लग्न केले नाही.

ब्रेकअपनंतर देखील एकत्र केले काम – अक्षय कुमारने स्पष्टपणे सांगितले होते की, त्याचा फक्त रवीनासोबतच साखरपुडा झाला होता आणि नंतर तो हि तुटला. आम्ही कधीही लग्न केले नव्हते. यासोबत अक्षयने असेही सांगितले की ब्रेकअपनंतरही रवीना आणि त्यांच्यातील संबंध कधीही बिघडले नाहीत आणि आजही त्यांचे नाते खूप चांगले आहे.

अक्षयने त्याच्या याच मुलाखतीत सांगितले होते की, ब्रेकअपनंतरही त्याने रवीना टंडनसोबत बराच काळ वेगवगेळ्या चित्रपटासाठी चित्रीकरण केले आहे. मात्र, दोघांमध्ये वैमनस्य असे काही नव्हते. या जोडप्याने मोहरा, खिलाडीयों के खिलाडी, दावा, किंमत, गनपाउडर, पोलीस फोर्स आणि ऐन सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. नंतर अक्षय कुमारने अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत लग्न केले. या दोघांना ही आरव आणि नितारा नावाची २ मुले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !