Headlines

तारक मेहता मधील भाभी आहे खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड, चाहते होतील घायाळ !

तारक मेहताका उल्टा चष्मा फेम माधवी भाभी म्हणजेच भिडेंची बायको. तारक मेहता मधील अगदी प्रत्येक कलाकाराला आज लोक नीट ओळखतात. गेली चौदा वर्ष सलग हे सगळे लोकांचं मनोरंजन करत आहेत. यामधील प्रत्येक पत्राची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. त्यामुळेचं एवढी वर्ष या सगळ्यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. यातीलच एक पात्र आहे माधवी भाभी जी नेहमी आपल्याला साडीमध्ये दिसते.

माधवी भाभी सिरिअलमध्ये जरी नेहमी आपल्याला साडीमध्ये दिसत असली तरी ती रिअल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस आहे. तिचे खरे नाव सोनालिका जोशी आहे. सोनालिकाला एक मुलगी देखील आहे तिचे नाव आर्या जोशी. सोशल मीडियावर जर आपण सोनालिकाचे फोटो पाहिले तर ती किती फॅशनेबल आहे याचा आपल्याला अंदाज येईल.

पण तिची आता माधवी भाभी म्हणून जी ओळख तयार झाली आहे त्यामुळे प्रेक्षकांना तिला साडीमध्ये पाहण्याची सवय झाली आहे. म्हणूनच मधवी भाभी म्हणजेच सोनालिकाला वेगळ्या आउटफिटमध्ये पाहिल्यावर लोकांना वेगळे वाटते.

सोशल मीडियावर आपण जर सोनालिकाचे फोटो आणि व्हिडीओ पाहिले तर आपल्याला विश्वास बसणार नाही ही तिच साडीमध्ये दिसणारी माधवी भाभी आहे. पण माधवी भाभीचा हा ग्लॅमरस अवतार देखील तिच्या चाहत्यांना खूप आवडतो.

माधवी भाभीला पाहिल्यावर कोणालाच हे खरं वाटत नाही की, माधवी भाभी खऱ्या आयुष्यात एवढी बोल्ड आहे. सोनालिकाच्या फोटोना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. माधवी भाभीचे फॅन्स सोनालिकाला देखील तितकेच पसंत करतात.

सोनालिका सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. तिच्या सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतील. सोनालिका नेहमी अपडेट सोशल मीडियावर देत असते. तिचे फॅन्स देखील तिच्या फोटो व्हिडीओची नेहमी वाट पाहत असतात. इंस्टाग्रामवर सोनालिकाचे ६४९ हजार फॉलोअर्स आहेत. ती लहान लहान रील शूट करून देखील तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत असते.

सोनालिकाने मालिकांसोबतच चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. २००३ सालापासून तिने टिव्ही सिरिअलमध्ये काम करायला सुरुवात केली. पण सोनालिकाला तिची खरी ओळख तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमध्ये काम करायला लागल्यानंतर मिळाली. फक्त हिंदीमध्येच नाही तर मराठी मालिकांमध्ये देखील सोनालिकाने काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !