मराठीतील एक चांगली अभिनेत्री तुझ्यात जीव रंगलाची फेम कल्याणी कुरळे जाधव हिचे अपघातामध्ये निधन झाले आहे. कल्याणीने दाख्खनचा राजा जोतिबामध्ये देखील काम केले होते. कोल्हापूर रोडवर एका डंपरची धडक लागली आणि हा अपघात झाला. या अपघातात मात्र कल्याणीला आपला जीव गमवावा लागला. ती तिचे हॉटेल बंद करून घरी जात असताना हा अपघात झाला. हालोंडी सांगली फाट्यावर तिचे हॉटेल आहे. याच्या जवळच्याच परिसरात हा अपघात झाला.
कल्याणीने काही दिवसांपूर्वीच तिचे हे नवीन हॉटेल सुरु केले होते. रोज ती तिच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची उठबस करायची. कल्याणी कामात फारच निपुण होती त्यामुळेच ती तिचं शूटिंग सांभाळून हॉटेल देखील चांगल्या पद्धतीने सांभाळायची.
कल्याणीने सोशल मीडियावर तिची शेवटची पोस्ट मृत्युच्या २२ तास आधी केली होती ज्यात तीने सलाड खातानाचा फोटो टाकला होता. या सोबतच तिने एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात ती कल हो ना हो या गाण्यावर डान्स करत होती.
गेल्या काही दिवसांपूर्वीच कल्याणीने तिचा वाढदिवस साजरा केला. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. सध्या कल्याणीने दख्खनचा राजा जोतिबा आणि तुझ्यात जीव रंगला या सिरिअलमध्ये काम केले होते. त्याचबरोबर या आधीदेखील कल्याणीने अनेक टीव्ही सिरिअल आणि शोमध्ये काम केले आहे. कल्याणी मूळची कोल्हापूरचीच आहे तिने तिचे शिक्षण देखील तिथेच पूर्ण केले.
कल्याणीच्या असे अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. खूप कमी वेळात कल्याणीने इंडस्ट्रीमध्ये तिची ओळख निर्माण केली होती. पण आता कल्याणीच्या मृत्यूची बातमी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
कोल्हापूर सांगली मार्गावर हल्ली अपघाताचे प्रमाण वाढले होते. अशाच एका अपघातात कल्याणीला देखील आपला जीव गमवावा लागला. तिच्या सोबतच्या कलाकारांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. सगळ्यांनाच या गोष्टीचे फार वाईट वाटले आहे.
कल्याणीने प्रेमाची भाकरी नावाने तिचे स्वतःचे हॉटेल सुरु केले होते. वाढदिवसाच्या दिवशी कल्याणीने भाकरी बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यावेळेस ती म्हणाली मी माझा वाढदिवस लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला ना कुठे बाहेर गेली की पार्टीला गेली. हे स्वामींनीच माझ्याकडून करून घेतले आहे.
View this post on Instagram
माझे वाढदिवस असेच जाऊदेत असे कल्याणी म्हणाली होती. स्वामी तुमचे आशीर्वाद माझ्या मागे आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असूद्यात मला हे सगळं करण्यासाठी ताकद द्या. ही कल्याणीची पोस्ट आता सोशल मीडियावर वायरल होत आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !