जान्हवी कपूरचा नवीन चित्रपट मिली लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामुळे सध्या जान्हवी चर्चेत आहे. जान्हवी कपूर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेली आपल्याला दिसते. तिच्या फॅन्ससाठी जान्हवी नेहमीच वेगवेगळे फोटो व्हिडीओ शेअर करत असते.
ज्याला तिचे फॅन्स देखील चांगला प्रतिसाद देतात. हल्ली जान्हवी मिली चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सगळीकडे जात आहे. अशाच एका इव्हेंटला जात असताना जान्हवीला स्पॉट केले. यावेळेचे तिचे फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत.
यासोबतच जान्हवीचा आणखी एक व्हिडीओ वायरल होत आहे ज्यात जान्हवी नेहमी प्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. पण यावेळेस तिने जे घातले आहे त्यात ती कंफर्टेबल नाही दिसत आहे. जान्हवी गाडीमध्ये बसलेली असतानाचा हा व्हिडीओ आहे या व्हिडीओमध्ये जान्हवी सारखी तिची साडी नीट करत आहे.
या साडीवरचे फोटो जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. यामध्ये जान्हवीने सिल्व्हर रंगाची टिकल्यांची साडी घातली आहे. सोबत स्लीव्हलेस ब्लाउज आणि कानातले घातले आहेत. जान्हवीने यात न्यू’ड मेकअप केला आहे ज्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
दिवाळी निमित्ताने सगळीकडेच दिवाळी सेलिब्रेशन सुरु आहे. अनेक फिल्मस्टार सोबतच फिल्म मेकर्स सुद्धा दिवाळी पार्टी आयोजित करत आहेत. हल्लीच अमृतपाल सिंह यांनी सुद्धा अशीच एक पार्टी आयोजित केली होती. याच पार्टीच्या वेळेचा जान्हवीचा हा व्हिडीओ आहे.
जान्हवीने यात साडी घातली आहे आणि ती गाडीमध्ये बसून जात आहे. कॅमेरामन तिला शूट करत आहे हे जान्हवीच्या लक्षात आले तेव्हा तिने आधी चेहरा लपवण्याचा प्रयन्त केला. नंतर ती तिची साडी सावरताना दिसत आहे. जान्हवी सारखी सारखी तिची साडी नीट करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
जान्हवी सध्या मिली चित्रपटच्या प्रमोशनमध्ये बिजी आहे. मिली हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. मिली चित्रपटात जान्हवी कपूर सोबत सनी कौशल, मनोज पाहवा यांनी देखील काम केले आहे. या चित्रपटात एक २४ वर्षांची मुलगी आहे जिचे शिक्षण बिएससी नर्सिंगमध्ये झाले आहे. ही एकदा फ्रीझरमध्ये अडकते तेव्हा तिचा तिथून बाहेर पडण्यासाठीचा संघर्ष आणि जिवंत राहण्यासाठीचा खटाटोप या चित्रपटात दाखवला आहे.
४ नोव्हेंबर २०२२ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. मिली हा चित्रपट हेलन या माल्याळम भाषेतील चित्रपटचा रिमेक आहे. मिली चित्रपटला ए आर रेहेमन यांनी म्युसिक दिले आहे. मिली हा चित्रपट चांगला चालावा याकर्ता सध्या सगळ्यांचे प्रयन्त सुरु आहेत. जान्हवी देखील मिली चित्रपटाचे प्रमोशन मोठ्या प्रमाणात करत आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !