Headlines

सलमान खानच्या दुसऱ्या भावाचा पण घ’ट’स्फो’ट, अरबाजचा तर या पूर्वीच झालाय !

बॉलिवुडमध्ये ब्रेकअप-पॅचअपचे वारे सारखे वाहतच असतात. पण अनपेक्षित कपल कडुन या गोष्टी ऐकल्यावर थोडा धक्का बसतो. बॉलिवुड अभिनेता सोहेल खान आणि त्याची पत्नी आता एकमेकांपासुन वेगळे होत आहे. दोघेही घ’ट’स्फो’ट घेत आहेत. या दोघांचे २४ वर्षांचे लग्न तुटत आहे. या दोघांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. असे म्हटले जाते की दोघेही खुप काळापासुन वेगळे राहत होते. १३ मे ला दोघेही सोहेल खान आणि सीमा सचदेव घ’ट’स्फो’ट चा अर्ज घेऊन फॅमिली कोर्टात गेले होते. त्याचे ते फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण दोघांनी अजुनतरी या संदर्भातील अधिकृत घोषणा केलेली नाही.

सोहेल आणि सीमा यांचे लव्ह मॅरेज झाले होते. या दोघांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्ट प्रमाणे होती. सीमा मुळची दिल्लीची तिला फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्वताचे नाव कमवायचे होते. सोहेल आणि सीमाची पहिली ओळख चंकी पांडेच्या एंगेजमेंट पार्टीमध्ये झाली. सोहेलला पहिल्या नजरेत सीमा आवडली होती. २४ वर्षांपुर्वी दोघांनी पळुन जाऊन लग्न केले.

सोहेलने १९९८ मध्ये सिमा सचदेवशी लग्न केले. या दोघांचे नाते त्यांच्या घरच्यांना नामंजुर होते. या दोघांचा धर्म वेगळा असल्यामुळे सीमाचा परिवार या लग्नासाठी राजी नव्हता. त्यामुळे अर्ध्या रात्री मौलवीला कि’ड’नॅ’प करुन आणले व दोघांचा ही निकाह लावण्यात आला. त्यानंतर दोघांनी दुसऱ्यांदा आर्य समाज मंदिरात लग्न केले. २७ मार्चला सोहेल खानने दिग्दर्शित केलेला जब प्यार किया तो डरना क्या हा चित्रपट रिलीज झाला होता.त्याचवेळी त्याने सीमासबत पळुन जाऊन लग्न केले.

मध्यंतरी २०१७ मध्ये या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची खबर आली होती. एका शो मध्ये ते दोघे वेगवेगळ्या घरात राहत असल्याचे दाखवले गेले होते आणि त्यांची मुले दोघांच्या घरी आलटुन पालटुन जाताना दिसत होते. त्या शोने ते दोघे एकत्र राहत नसल्याच्या चर्चांना समर्थन दिले होते.

या शोमध्ये सीमाने म्हटलेले की, आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा असे कधी कधी घडते. तुमची नाती वेगवेगळ्या दिशेला जातात. मी याबद्दल कोणतीही माफी मागत नाही. कारण आम्ही आणि आमची मुले खुश आहोत. सोहेल आणि मी एका पारंपारिक विवाहबंधनात नाही पण आम्ही एक परिवार आणि एक युनिट आहोत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !